धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी सरकारचा प्रशासनावर ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:20 PM2018-01-29T15:20:35+5:302018-01-29T15:21:09+5:30

धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पाटील यांच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देऊ, असं आश्वासन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

Govt blames administration for the death of Dharma Patil | धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी सरकारचा प्रशासनावर ठपका

धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी सरकारचा प्रशासनावर ठपका

googlenewsNext
ठळक मुद्देव्याजासह मोबदला देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पाटील यांच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देऊ, असं आश्वासन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. तसेच, धर्मा पाटील यांची ही आत्महत्या नसून सरकारी यंत्रणेने केलेली हत्याच आहे, असा आरोप करत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर ठपका ठेवला.
मंत्रालयाच्या दारात विष प्राशन करणारे धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचं रविवारी रात्री निधन झालं. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका मांडली. 'जमिनीचं चुकीचं फेरमूल्यांकन झाल्यानं मोबदला कमी मिळाल्याची पाटील यांची तक्रार होती. त्याची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करत आहे. येत्या सात दिवसांत चौकशी पूर्ण होईल. १९९ हेक्टर जमीनीचे फेरमूल्यांकन करण्यात येईल,' असं बावनकुळे यांनी सांगितलं.
'सानुग्रह अनुदान धर्मा पाटील यांच्या जमिनीसह अन्य जमीनधारकांना देता येईल का याची चाचपणी करण्याकरता अहवाल मागवला आहे,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, या जमिनींचं फेरमूल्यांकन २००९ ते २०१५ या काळात झालं असून त्याच काळात पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगत बावनकुळे यांनी या प्रकरणाचे सर्व खापर अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर फोडले.

 

Web Title: Govt blames administration for the death of Dharma Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.