ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:59+5:302021-02-10T04:09:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : राज्य शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन देण्याचा निर्णय घेतला. परंतु, ताे आजपर्यंत कर्मचाऱ्यांना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : राज्य शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन देण्याचा निर्णय घेतला. परंतु, ताे आजपर्यंत कर्मचाऱ्यांना लागू झाला नाही. शिवाय, विमासुद्धा लागू केलेला नाही. यामुळे ग्रा.पं. कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देऊन विमा लागू करावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने खंडविकास अधिकारी दीपक गरुड यांना निवेदन साेपविले आहे.
शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन देण्याचा निर्णय घेतला. मात्र ताे लागू झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंताेष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात ग्रा.पं. कर्मचारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष जयदेव आंबुलकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सावनेरचे खंडविकास अधिकारी दीपक गरुड व विस्तार अधिकारी हरिचंद्र साबळे यांना निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हा सचिव अशाेक कुथे, कमलाकर गुडधे, गाेपाल कार्तिक तसेच सावनेर तालुका अध्यक्ष धाेंडबा माेजनकर, सचिव माेहन माेहतुरे, विजय डंभारे, चिंतामणी राऊत, प्रमाेद अटळकर, गाैतम पाटील, जितू गाेडबाेले, रूपराव ठमके यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित हाेते.