जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्डद्वारे ठेवता येईल शालेय विद्यार्थ्यांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 07:10 AM2022-01-01T07:10:00+5:302022-01-01T07:10:01+5:30

Nagpur News शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पाहता, नागपुरातील एका युवा संशोधकाने जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्ड तयार केले आहे.

GPS tracker smart ID card can be used to 'watch' school children | जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्डद्वारे ठेवता येईल शालेय विद्यार्थ्यांवर ‘वॉच’

जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्डद्वारे ठेवता येईल शालेय विद्यार्थ्यांवर ‘वॉच’

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरचा युवा संशोधक गौरव सव्वालाखेने विकसित केले तंत्रज्ञान


दयानंद पाईकराव

नागपूर : शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरणाच्या घटना नेहमीच घडत असतात. घरातून बाहेर पडणाऱ्या मुलांची सुरक्षा पालकांच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरत आहे. ही चिंता दूर करण्याचा प्रयत्न नागपूरचा तरुण संशोधक गौरव सव्वालाखे याने केला आहे. त्याने विकसित केलेल्या जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्डमुळे अशा संकटकाळात पालकांना लोकेशन कळू शकेल.

जर तुम्ही पालक आहात आणि तुमच्या मुलांना खेळायला किंवा शाळेत पाठवत आहात तेव्हा त्यांच्या सुरक्षेची काळजी नक्कीच तुम्हाला असेल. परंतु मुलाच्या ओळखपत्राच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. गौरवने बनविलेले यंत्र हजार ते दीड हजार रुपयात सहज तयार होते. त्यामुळे एखादा विद्यार्थी हरवल्यास किंवा त्याचे अपहरण झाल्यास त्या मुलाचे नेमके लोकेशन शोधणे शक्य झाले आहे. गौरवच्या या तंत्रज्ञानाचा वापर शाळेत जाणाऱ्या किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फायदेशीर ठरणार नाही तर कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकणार आहे.

लिंकद्वारे कळते लोकेशन

-ओळखपत्रात जीपीएस बेस ट्रॅकिंग लावले आहे. हे एक जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्ड आहे. या मध्ये एक सीमकार्ड वापरण्यात आले आहे. त्यामध्ये इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.

-आपल्याला एक एसएमएस पाठवावा लागतो. एसएमएस पाठविल्यानंतर त्या सीमकार्डमधून आपल्याला एक लिंक सेंड करण्यात येते.

-लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचे लोकेशन आपल्याला मिळते. विद्यार्थ्यांच्या गळ्यात असलेल्या ओळखपत्रात ही सिस्टिम लावता येते.

शाळा-महाविद्यालयात साधणार संपर्क

जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्ड हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी शाळा, महाविद्यालयात संपर्क साधणार येईल.

- गौरव सव्वालाखे, युवा संशोधक

............

Web Title: GPS tracker smart ID card can be used to 'watch' school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.