नोकरीचे आमिष दाखवून रोकड हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 08:25 PM2021-06-12T20:25:09+5:302021-06-12T20:26:23+5:30

Grabbed cash showing job lure ट्यूशन टीचरला नोकरीचे आमिष दाखवून एका स्वनामधन्य नेत्याने साडेतीन लाख रुपये हडपले.

Grabbed cash by showing job lure | नोकरीचे आमिष दाखवून रोकड हडपली

नोकरीचे आमिष दाखवून रोकड हडपली

Next
ठळक मुद्देस्वनामधन्य नेत्याविरुद्ध तक्रार - फसवणुकीचा आरोप, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - ट्यूशन टीचरला नोकरीचे आमिष दाखवून एका स्वनामधन्य नेत्याने साडेतीन लाख रुपये हडपले. चार वर्षांपासून त्याची सुरू असलेली बनवाबनवी लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. उपलब्ध पुराव्याच्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून जगदीश रमेश करिहार (वय ४२) नामक कथित नेत्याला अटक केली. रामेश्वर वामन भनारकर (वय ३२) असे पीडित तक्रारदाराचे नाव आहे. ते बिनाकी मंगळवारी परिसरात राहतात.

भनारकर खासगी शिकवणी वर्ग घेतात. आरोपी करिहारचा मुलगा त्यांच्याकडे शिकवणीसाठी जात होता. त्यातून करिहारची भनारकरसोबत ओळख होती. कडक कपडे घालून स्वत:ला नामवंत राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे करिहार सांगत होता. आपण नागपूर महानगर पालिकेत समन्वय समितीवर सदस्य तसेच विविध शासकीय, अशासकीय समितीवर पदाधिकारी असल्याची करिहार बतावणी करीत होता. आपण कुणालाही नोकरी लावून देऊ शकतो, अशीही थाप त्याने मारली होती. त्यामुळे भनारकर यांनी त्याला चार वर्षांपूर्वी आपल्याला नोकरी मिळेल काय, असे विचारले होते. यावेळी भनारकरला मेडिकलमध्ये कनिष्ठ लिपीक लावून देतो, असे सांगून करिहारने १२ नोव्हेंबर २०१७ ला त्यांची कागदपत्रे घेतली. त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले. काही दिवसानंतर लिपीक पदाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या, अशी थाप मारून नंतर सामान्य प्रशासन विभाग गोंदिया येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी पुन्हा एक लाख, ५० हजार रुपये घेतले. अशा प्रकारे साडेतीन लाख रुपये घेतल्यानंतर भनारकरचे पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतल्यानंतर त्याला बनावट नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र घेऊन भनारकर गोंदियाला गेले असता ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. भनारकरने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर आपली रक्कम परत मागणे सुरू केले. तेव्हा आरोपी टाळाटाळ करू लागला. तो रक्कम परत करणार नाही, हे ध्यानात आल्याने भनारकरने पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार संजय मेंढे यांनी फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून करिहारला शुक्रवारी अटक केली.

दोन दिवसाचा पीसीआर

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अटक करण्याच्या तयारीत असताना आरोपी करिहारने पोलिसांवरही वेगवेगळ्या पद्धतीने दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दडपणाला झुगारून पोलिसांनी त्याला अटक करून त्याचा न्यायालयातून दोन दिवसाचा पीसीआर मिळवला.

Web Title: Grabbed cash by showing job lure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.