पदवीधर मतदारसंघ निवडणूक : ‘कोरोना’मुळे वाढले मतदान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 11:44 PM2020-11-04T23:44:29+5:302020-11-04T23:46:19+5:30
Graduate Constituency Election Polling Stations Increases ‘कोरोना’च्या सावटाखाली होत असलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळता यावे यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या सावटाखाली होत असलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळता यावे यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. मागील निवडणूकीत विभागातील सहा जिल्ह्यात २५६ मतदान केंद्र होते. यंदा हीच संख्या ६४ ने वाढविण्यात आली असून विभागात एकूण ३२० मतदार केंद्र राहतील.
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक २३ मतदान केंद्र वाढले आहे. याच जिल्ह्यात जवळपास अर्धे मतदार आहेत. सर्व सहाही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी मतदान केंद्रांची यादी जाहीर केली. प्रत्येक हजार मतदारांच्या मागे एक मतदान केंद्र स्थापित व्हावे असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानादरम्यान मास्क, सॅनिटायझर, साबण, थर्मल स्कॅनिंग, ग्लोव्ह्ज यांचा उपयोग अनिवार्य आहे. निवडणूक प्रचारांतर्गत होणाऱ्या रॅली, संमेलने व बैठकांवर बंदी असेल. नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी जाणाऱ्या उमेदवारासोबत दोन लोकांना परवानगी देण्यात येईल.
कुठे किती मतदान केंद्र
जिल्हा - जुने केंद्र - नवीन केंद्र - एकूण केंद्र
नागपूर - १३९ - २३ - १६२
भंडारा - २० - ११ - ३१
गोंदिया - १५ - ६ - २१
वर्धा - २९ - ६ - ३५
चंद्रपूर - ३६ - १४ - ५०
गडचिरोली - १७ - ४ - २१
एकूण - २५६ - ६४ - ३२०