ग्रामजयंती यंदाही घरूनच व साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:53+5:302021-04-28T04:07:53+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ३० एप्रिल हा जन्मदिवस ग्रामजयंती म्हणून साजरा होतो. यंदाही कोरोना संक्रमणामुळे हा दिवस साधेपणाने ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ३० एप्रिल हा जन्मदिवस ग्रामजयंती म्हणून साजरा होतो. यंदाही कोरोना संक्रमणामुळे हा दिवस साधेपणाने आणि घरूनच साजरा होणार आहे. तुकडोजी महाराजांनी आपला जन्मदिवस समारंभाने साजरा न करता ग्रामजयंती म्हणून राबविला जावा, सार्वजनिक स्वच्छता, ग्रामसफाई अशा उपक्रमातून केला जावा, अशी संकल्पना मांडली होती. त्यानुसार गावामध्ये गुरुदेव सेवा मंडळ आयोजन करीत असतात. मागील वर्षी कोरोना संक्रमणामुळे हा दिवस साधेपणाने घरूनच पाळण्यात आला होता. यंदाही घराच्या सभोवतालचा परिसर श्रमदानाने स्वच्छ करून घरूनच ग्रामजयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री गुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी परिसर स्वच्छतेसोबत अंगण रांगोळ्यांनी सजवावे. राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची सुंदर सजावट करावी तसेच आपल्या कुवतीप्रमाणे गरजूंना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.