ग्रामपंचायत निवडणूक : प्रचारासाठी उमेदवारांना २५ ते ५० हजार खर्च मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 08:43 PM2020-12-16T20:43:53+5:302020-12-16T20:45:57+5:30
Gram Panchayat Election, nagpur news कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जवळपास आठ महिन्यानंतर होत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना २५ ते ५० हजार रुपयांपर्यतचा खर्च करता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका जवळपास आठ महिन्यानंतर होत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना २५ ते ५० हजार रुपयांपर्यतचा खर्च करता येणार आहे.
राज्यात पंधरा हजार ग्रामपंचायती असून जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीची गणिते जुळविण्याची रणनीती आखणे सुरू झाले आहे. या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून दखल घेण्याची शक्यता आहे. या ग्राम पंचायती ताब्यात मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होणार नसून पारंपरिक पद्धतीने म्हणजे सदस्यांमधून होणार आहे. ही निवडणूक गावापुरती मर्यादेत असली तर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या निवडणुकीत उमेदवारास २५ ते ५० हजार रुपयेपर्यंतचा खर्च करता येणार आहे. या मर्यादेपेक्षा जास्त पैसा खर्च करणाऱ्याचे सदस्यत्व धोक्यात येईल. आरक्षित वर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज केल्याची पोचपावती नामांकन पत्र दाखल करताना जोडावी लागणार आहे.
ग्रामपंचायत सदस्य संख्या उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा
७ ते ९ २५ हजार रुपये
११ ते १३ ३५ हजार रुपये
१५ ते १७ ५० हजार रुपये