ग्रामपंचायत निवडणूक निकाल; भाजप-शिंदे सेनेकडे निम्म्यावर ग्रामपंचायती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 11:57 AM2022-12-20T11:57:51+5:302022-12-20T12:00:13+5:30

Nagpur News  पहिल्या टप्प्यात  आलेल्या १००० ग्रामपंचायतीच्या निकालापैकी ५१३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहे. १४० ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेने राखल्या आहे. काँग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली आहे.

Gram Panchayat Election Results; BJP-Shinde Sena has half of Gram Panchayats | ग्रामपंचायत निवडणूक निकाल; भाजप-शिंदे सेनेकडे निम्म्यावर ग्रामपंचायती 

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; भाजप-शिंदे सेनेकडे निम्म्यावर ग्रामपंचायती 

googlenewsNext

नागपूर  ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या कामाची छाप दिसून आली आहे.  पहिल्या टप्प्यात  आलेल्या १००० ग्रामपंचायतीच्या निकालापैकी ५१३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहे. १४० ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेने राखल्या आहे. काँग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली आहे.  संपूण्र निकाल येतील तेव्हा ३ हजार ग्रामपंचायती भाजपाच्या असतील तर १ हजार ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेच्या असतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  

महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील अडीच वर्षे त्यांनी नागपुरात अधिवेशन घेतले नाही. नागपूर कराराचा भंग केला. आज तेच लोक हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यांचे घ्या अशी मागणी करताहेत. वास्तविक पाहता त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवला आहे. त्यांचे मागील अडीच वर्षांतील वागणे काँग्रेसधार्जिणे आहे. भविष्यात ते ओवेसीसोबतही युती करतील, असे बावनकुळे म्हणाले.

Web Title: Gram Panchayat Election Results; BJP-Shinde Sena has half of Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.