ग्रा. पं. निवडणुकीची ठिणगी पेटली : नागपूरनजीक चांपा येथे दोन गटात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 08:50 PM2018-09-29T20:50:51+5:302018-09-29T20:54:38+5:30

उमरेड तालुक्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. कुठेही गालबोट लागले नाही. आता निवडणूक आटोपताच शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चांपा येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात राडा झाला. एकमेकांना जोरदार हाणामारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Gram Panchayat Elections sparked: Clashed between two groups in Champa near Nagpur | ग्रा. पं. निवडणुकीची ठिणगी पेटली : नागपूरनजीक चांपा येथे दोन गटात राडा

ग्रा. पं. निवडणुकीची ठिणगी पेटली : नागपूरनजीक चांपा येथे दोन गटात राडा

Next
ठळक मुद्देसात जखमी, नागपूर मेडिकलमध्ये भरती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड तालुक्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. कुठेही गालबोट लागले नाही. आता निवडणूक आटोपताच शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चांपा येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात राडा झाला. एकमेकांना जोरदार हाणामारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण मारहाणीच्या घटनेत सुखराम भोसले (४०) रा. येरणगाव ता. हिंगणा, सुखमा पवार (३०) रा. गरडापार, सुरेश भोसले (५०), सुषमा भोसले (३०), कैलास पवार (३५), राणी भोसले (२७), सुजित भोसले (३०) सर्व रा. चांपा हे सात जण जखमी झाले. यापैकी सुरेश भोसले आणि सुखराम भोसले दोघेही गंभीर असल्याची माहिती आहे. सातही जखमी नागपूर मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्याशी या घटनेबाबत संपर्क साधला असता, अद्याप याबाबतचा गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
चांपा येथे नूकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून आतिश पवार विजयी ठरले. त्यांच्या गटातील सुरज माहुरे यांनी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक जिंकली. सुरज माहुरे याच्याविरोधात शिवसागर राजपूत रिंगणात होता. याकारणाने निराश आणि हताश झाला. शिवाय आतिश पवार आणि सुरज माहुरे या दोघांना सुरेश भोसले यांनी सर्वतोपरी मदत केली. याकारणावरून शिवसागर राजपूत चिडलेला होता. दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवसागर आणि अन्य काहींनी सुरेश भोसले याच्यावर हल्ला केला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी दिली.
त्यानंतर दिवसभर दोन गट वारंवार आमनेसामने आल्याने यावरून अनेकदा वादविवादाची ठिणगी उडत होती. एकमेकांना मारहाणीच्याही घटना घडल्याचे समजते. या मारहाणीत दोन चार चाकी वाहनांचीही तोडफोड केल्या गेल्याचीही बाब व्यक्त होत असून पुढील तपास कुही पोलीस करीत आहे.

Web Title: Gram Panchayat Elections sparked: Clashed between two groups in Champa near Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.