भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रा

By नरेश डोंगरे | Published: April 21, 2024 10:08 PM2024-04-21T22:08:09+5:302024-04-21T22:09:37+5:30

श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट इतवारी तर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेचे नेतृत्व मंदीराचे अध्यक्ष आनंद मौजीलाल जैन, मंत्री आशीष पंचमलाल जैन यांनी केले. शोभायात्रेला शहीद चौकातून सुरूवात झाली.

Grand procession in Nagpur on the occasion of Lord Mahavir Janm Kalyanak Mahotsav | भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रा

भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रा

नागपूर : भगवान महावीर स्वामी यांच्या २६२३ व्या जन्म कल्याणक महोत्सवाच्या निमित्ताने इतवारीतून आज भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष शरद मचाले, कार्याध्यक्ष सनत जैन, मंत्री विजय जव्हेरी यांच्या मार्गदर्शनात ही शोभायात्रा काढण्यात आली होती.

श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट इतवारी तर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेचे नेतृत्व मंदीराचे अध्यक्ष आनंद मौजीलाल जैन, मंत्री आशीष पंचमलाल जैन यांनी केले. शोभायात्रेला शहीद चौकातून सुरूवात झाली. गांधी पुतळा, बडकस चौक, कोतवाली चौक, कल्याणेश्वर मंदिर, झंडा चौक मार्गे कविवर्य सुरेश भट सभागृहात शोभायात्रा पोहचली. येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव वात्सल्य रत्नाकर मुनिश्री स्वात्मनंदीजी गुरुदेव, मुनिश्री आचरणसागरजी गुरुदेव, मुनिश्री शिवसागरजी गुरुदेव, मुनिश्री अजयसागरजी गुरुदेव, मुनिश्री जयपाल विजय जी म. सा., श्री व्रत सागरजी महाराज यांच्या परम सानिध्यात संपन्न झाला. शोभायात्रेत सकल जैन समाजाच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिला तसेच मुलांनी महावीर भगवान यांचे संदेश तसेच विश्व शांतीच्या संदेशाचा जयघोष केला.

ठिकठिकाणी झाले शोभायात्रे स्वागत
या भव्य शोभायात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. मध्य नागपूर भाजपाकडून माजी आमदार गिरीश व्यास तसेच श्रीकांत आगलावे, बाहुबली पळसापूरे, गजेंद्र पांडे, मनोज बंड, मुकेश जैन यांच्या नेतृत्वात शोभायात्रेचे बडकस चाैकात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. पुलक मंच परिवार, महाल शाखेकडूनही स्वागत करण्यात आले. तर, विजयराव भुसारी परिवाराकडूनही किल्ला रोड, परिसरात पुष्पवर्षाव करण्यात आला.

आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष
शोभायात्रेत सादर करण्यात आलेले वेगवेगळे देखावे (झांकीयां) विशेष आकर्षण ठरले. श्री दिगंबर जैन मंदिर अंबा नगर, महावीर यूथ क्लब, श्री दिगंबर जैन जागरण युवा मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २४ तीर्थंकरांचा आकर्षक देखवा तसेच १२१ भव्य जैन ध्वज रॅलीही मुख्य आकर्षण होती. याशिवाय अन्य देखाव्यात सतपथ पाठशाला एम्प्रेस मिल, तीर्थंकर महावीर यांची परंपरा, जैन सेवा संघ तुलसी नगर, पंच परमेष्ठी दर्शन श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर तुलसीनगर, श्री दिगंबर जैन परवार पूरा मंदिर इतवारी, भारतवर्ष दिगंबर जैन महिला परिषद परवारपुरा, महिला मंडळ हस्तकला प्रशिक्षण केंद्र, श्री महावीर विद्या निकेतन छात्रावास, श्री कुंदकुंद दिगंबर जैन स्वाध्याय मंडळ ट्रस्ट नेहरू पुतळा, श्री ज्ञानोदय सेवा संघ यांच्याही आकर्षक देखाव्यांचा शोभायात्रेत सहभाग होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत बानाईत, महेंद्र सिंघवी, कमलराज धाडीवाल, प्रशांत सवाने, अॅड. चैतन्य आग्रेकर, जीवनलाल जैन, भरत आसानी, मनीष छल्लानी, मनोज रतिचंद जैन, सुधीर बैद, बाहुबली पळसापुरे, धरमचंद खजांची, दिलीप गांधी, चंद्रकांता कासलीवाल, छाया जैन, संध्या जैन, गीता कोटेचा, राखी शाह, स्मिता क्षीरसागर आदींनी प्रयत्न केले.

सैतवाल मंदिरात अभिषेक
इतवारी शहीद चाैकातील श्री पार्श्वप्रभू दिगंबर जैन सैतवाल मंदिरात भगवान महावीर यांचा अभिषेक शांतिधारा पं. अभिजीत बंड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. शांतिधारेचे सौभाग्य राजकुमार जैन, विनोद गिल्लरकर, अनुज नखाते, मानस पिंजरकर यांना मिळाले. या प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष दिलीप राखे, आनंद नखाते, मनीष पिंजरकर, अनंत शिवनकर, विलास गिल्लरकर, प्रशांत मानेकर, जितेंद्र गडेकर, दिनेश सावलकर, सतीश श्रावणे, दिनेश येलवटकर, राजेश जैन, दिनानाथ वाकेकर, अशोक उदेपुरकर, प्रमोद राखे उपस्थित होते.

सेनगण जैन मंदिरात शांतिधारा
लाडपुरा इतवारी येथील श्री दिगंबर जैन सेनगण मंदिरात भगवान महावीर यांची शांतिधारा झाली. या प्रसंगी अध्यक्ष सतीश जैन पेंढारी, सुहास मुधोळकर, किरण जोहरापुरकर, परिमल खेडकर, संगीता जैन पेंढारी उपस्थित होते.
 

Web Title: Grand procession in Nagpur on the occasion of Lord Mahavir Janm Kalyanak Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.