राज्यातील सर्वात भव्य रक्तदान मोहीम, देशभरातील दिग्गजांचा मोहिमेला आशीर्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:07 AM2021-07-12T04:07:10+5:302021-07-12T04:07:10+5:30
- विजय रुपाणी, मुख्यमंत्री, गुजरात सद्यस्थितीत जग एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महामारीमुळे आरोग्य सेवेवर ताण पडला आहे. विशेषत: ...
- विजय रुपाणी, मुख्यमंत्री, गुजरात
सद्यस्थितीत जग एका आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. महामारीमुळे आरोग्य सेवेवर ताण पडला आहे. विशेषत: रक्ताच्या तुटवड्यासंदर्भात जनतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात लोकमतने नेहमीच पुढाकार घेतला आहे. रक्ताचं नातं या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना रक्तदान करायची प्रेरणा मिळेल व राज्यभरात जागृती होईल हा विश्वास आहे.
-संजीव मेहता, चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड
लोकमतने राज्यभरात रक्तदानाची महामोहीम आयोजित केली आहे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. मागील १५ महिन्यात कोरोनामुळे रक्ताचे महत्त्वदेखील लोकांना समजत आहे. कोरोना जाईल व त्यानंतर रक्तदान करू अशी प्रतीक्षा करू शकत नाही. पुढील काही आठवड्यात अनेकांच्या लांबणीवर गेलेल्या शस्त्रक्रिया नियोजित असतील व त्यांना रक्ताची गरज भासेल. ही गरज नक्कीच लोकमतच्या या महायज्ञातून पूर्ण होण्यास मदत मिळेल.
- सॅम बलसारा, चेअरमन, मॅडिसन वर्ल्ड
रक्तदानासारखे जगात इतर कुठलेही दान नाही. विजय दर्डा यांच्या नेतृत्वात लोकमतने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समाजातील प्रत्येकाने व विशेषत: तरुणांना यातून निश्चित प्रेरणा मिळणार आहे. या मोहिमेतून अनेक रुग्णांना नवजीवन मिळणार आहे. या आयोजनासाठी माझ्या लोकमत समूहाला शुभेच्छा.
- आशिष भसिन, सीईओ, एपीएसी अॅन्ड चेअरमन इंडिया डेन्ट्सू
रक्तदानासारख्या अतिशय पवित्र कार्याशी लोकमतने जुळल्याची संधी दिली ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. संकटाच्या या काळात लोक केवळ विचार व चर्चा यांच्यापुरते मर्यादित असताना लोकमतने राज्यभरात रक्तदान मोहीम राबवून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. ही मोहीम निश्चितपणे यशस्वी तर होईलच, शिवाय समाज व देशाला नवीन दिशादेखील दाखवेल.
- शशी सिन्हा, सीईओ-इंडिया, आयटीजी मीडिया ब्रॅन्ड
रक्ताचं नातं ही रक्तदानाची मोहीम राबवून लोकमतने जनतेला रक्तदानासाठी हक्काचा व विश्वासाचा मंच उपलब्ध करून दिला आहे. या मोहिमेशी जास्तीत जास्त लोकांनी जुळून समाजासाठी विधायक कामात आपले योगदान दिले पाहिजे.
-हर्ष मारिवाला, चेअरमन, मॅरिको लिमिटेड