८ वाजता आलेलेे आजोबा १.३० वाजताही रांगेतच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:03 PM2021-03-04T12:03:36+5:302021-03-04T12:04:22+5:30
Nagpur News रामदासपेठ येथील कुंदन ठक्कर (७८) आणि जयश्री ठक्कर (७१) हे वृद्ध जोडपे १२ वाजता आलेले. गर्दी पाहून आणि आपल्याही आधीपासून आलेल्यांचा नंबर अद्याप न लागल्याचे पाहून प्रचंड वैतागलेले दिसले. ते म्हणाले, आम्हाला दुपारी १२ वाजताचा वेळ दिला होता. पण काही खरे दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: केंद्रावरील सर्वच ज्येष्ठ नागरिक त्रस्त दिसले. रामदासपेठ येथील कुंदन ठक्कर (७८) आणि जयश्री ठक्कर (७१) हे वृद्ध जोडपे १२ वाजता आलेले. गर्दी पाहून आणि आपल्याही आधीपासून आलेल्यांचा नंबर अद्याप न लागल्याचे पाहून प्रचंड वैतागलेले दिसले. ते म्हणाले, आम्हाला दुपारी १२ वाजताचा वेळ दिला होता. पण काही खरे दिसत नाही.
इतवारीमधील पद्माकर काशिकर हे ७८ वर्षांचे आजोबा म्हणाले, सकाळी ८.३० वाजता आलो. माझ्याही आधी आलेले अद्यापही रांगेत आहेत. नक्की वेळ दिला असता तर आमचा त्रास वाचला असता.
रामदासपेठ येथीलच ७९ वर्षांच्या आजी मणीदेवी त्रिवेदी म्हणाल्या, अडीच तासांपासून वाट पहाणे सुरूच आहे. सोबत नातेवाईक आहेत म्हणून ठिक, नाहीतर या गर्दीत काहीच शक्य झाले नसते.
७४ वर्षांच्या इंद्राबाई दयाराम बुरांडे या सहकार नगरच्या. सकाळी १० वाजता आलेल्या. बऱ्याचे उशिराने त्यांना टोकन मिळाले. सायंकाळी ४ ते ५ वाजता नंबर लागणार असल्याचे कळल्याने आता निवांत बसण्याशिवाय पर्याय नाही, असे त्या म्हणाल्या.
बाजीप्रभू नगरचे नरेंद्र नंदलाल वर्मा आणि संतोषी वर्मा हे ज्येष्ठ नागरिक असलेले जोडपे तर ७.३० वाजतापासून आलेले. एवढ्या लवकर येऊनही त्यांना १७५ क्रमांकाचे टोकन मिळाले. ओळखी असणाऱ्यांच्या नातेवाईकांनी गर्दीत मध्ये शिरून टोकन मिळविले, आम्ही म्हातारी माणसं या गर्दीत काय धक्काबुक्की करणार, असा त्यांचा प्रश्न होता.
सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाल्याने नियोजन कोलमडले आहे. या रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. वरच्या माळ्यावर ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचारात दाखल आहेत. पहिल्या माळ्यावर टेस्टिंग सेंटरही आहे. रोजचे ४-५ पॉझटिव्ह नमुने येतात. त्यामुळे संसर्ग होऊ न देणे ही आमची प्राथमिकता आहे. गर्दीच्या तुलनेत इमारत लहान पडत आहे. रुग्णांच्या सोईसाठी बाहेर पेंडाल टाकला जात आहे. पाण्याची व्यवस्थाही केली आहे.
- डॉ. कांचन किंमतकर, इन्चार्ज, इंदिरा गांधी रुग्णालय
...