नातवानेच केली ७८ वर्षीय आजीची निर्घृण हत्या, खुर्चीला हात-पाय बांधून चिरला गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 11:19 AM2021-11-30T11:19:10+5:302021-11-30T21:37:05+5:30

नंदनवनमधील निवृत्त महिला डॉक्टरची खुर्चीला बांधून, गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा लावला आहे. नातवानेच आजीबाईचा खून केल्याचे समोर आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Grandson killed 78-year-old retired female doctor in nandanvan | नातवानेच केली ७८ वर्षीय आजीची निर्घृण हत्या, खुर्चीला हात-पाय बांधून चिरला गळा

नातवानेच केली ७८ वर्षीय आजीची निर्घृण हत्या, खुर्चीला हात-पाय बांधून चिरला गळा

Next
ठळक मुद्देनंदनवनमधील निवृत्त महिला डॉक्टरच्या हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा आरोपी अटकेत

नागपूर :  सेवानिवृत्त महिला डॉक्टर देवकी बोबडे यांंची हत्येचा छडा लावण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. त्यांचा नातूच हा हत्यारा निघाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विदेशात शिक्षणासाठी आजीने पैसे दिले नाही व रागावल्याने संतप्त झालेला २२ वर्षीय आरोपी मितेश पंचभाई याने आजीला संपवून टाकले. ५५ तासांच्या अखंड चौकशीअंती पोलीसांना या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. पोलिसांनी मितेश याला अटक केली आहे.

न्यू नंदनवन येथील रहिवासी ७८ वर्षीय देवकी बोबडे यांची त्यांच्या घरातच गळा आवळून हत्या केली होती. ‘लोकमत’ने या प्रकरणात घरातील व्यक्तीकडूनच तिची हत्या केल्याची संशय वर्तविला होता. पोलिसांकडूनसुद्धा पहिल्या दिवसापासून त्याच दिशेने तपास करण्यात येत होता. पोलिसांचे घटनेपासूनच मितेशवर लक्ष होते; परंतु कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत व्यस्त असल्याने पोलीसांनी चौकशीत फार सक्ती केली नाही. मितेश याने मर्चंट नेव्हीमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा केला होता. त्याला उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत जायचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्याला एक मैत्रिण आहे. तिच्याशी त्याने आजीच्या वागणुकीबद्दल व पैशांच्या व्यवस्थेबाबत चॅटिंग केली होती. त्यावरून पोलिसांचा मितेशवर संशय बळावला. सोमवारी रात्री पोलिसांना संधी मिळाली. त्यांनी रात्री १२ वाजता मितेशला पोलीस ठाण्यात बाेलावून चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने नकारात्मक भूमिका घेतली. मात्र, पोलीसी खाक्या दाखविल्याने मितेशने हत्येची कबुली दिली. मितेश हा अतिशय तापट स्वभावाचा आहे. देवकी बोबडे ह्या त्यांची मुलगी व नातवांवर अतिशय प्रेम करत होती. मितेशला उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला जायचे होते. त्याने ४० लाखांचे कर्ज घेतले होते. पुन्हा त्याला ६० लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी देवकी बोबडे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु काही दिवसांपासून मितेशच्या वागणुकीवरून देवकी त्याला टाळत होती. त्यामुळे मितेश संतप्त होता. देवकी यांचे पती आजारी असल्याने मितेशला मदतीला बोलाविल्यावर तो दुर्लक्ष करत होता. त्यामुळे मितेशसोबत तिचा वाददेखील होत होता.

सूत्रांच्या माहितीनुसार २७ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता मितेशच्या आईच्या सांगण्यानुसार तो पाण्याची मोटर बंद करण्यासाठी खाली आला. त्याने केवळ बरमुडा घातला होता. त्यामुळे देवकीने त्याला कपडे घालण्यास हटकले. त्यानंतर मितेशला पतीला बसवून देण्यासाठी मदत करण्यास बोलाविले. परंतु मितेशने नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यावरून मितेशने आजी देवकीची हत्या केली.

- पाच सात मिनिटांतच केला खेल

या वादानंतर मितेशने देवकीला धक्का दिला. मितेश अतिशय संतप्त झाला होता. त्याने पँटच्या आधारे देवकीचे तोंड दाबले. कपाटात ठेवलेली टेपपट्टीने देवकीचे हात बांधले. किचनमध्ये ठेवलेल्या चाकूने तिचा गळा कापला. त्यानंतर रक्ताने माखलेला चाकू धुवून पेपरने रक्ताचे डाग पुसून टाकले. टेपपट्टी आपल्या बॅगेत ठेवली. हे सर्व त्याने अवघ्या ५ ते ७ मिनिटांत केले. बॅगेतून मिळालेली टेपपट्टी व मैत्रिणीशी केलेल्या चॅटिंगमुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला.

- आजीनेच केले होते संगोपन

मितेशचे बालपणात आजी देवकीनेच पालनपोषण केले होते. मितेशचे आई-वडील आयुर्वेदिक डॉक्टर आहे. दोघेही सकाळी व सायंकाळी आपल्या क्लिनिकमध्ये जातात. त्यांना मितेशबरोबरच एक मुलगीही आहे. मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने आजी देवकीनेच दोन्ही मुलांचे संगोपन केले. ज्या नातवाला तिने बोट पकडून चालणे शिकविले तोच तिच्या जीवावर उठेल, असा तिने कधी विचारही केला नाही. मुलाकडून आईचाच खून केला गेला असेल यावर अजूनही त्याच्या आई-वडिलांचा विश्वास बसत नाही आहे. त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Grandson killed 78-year-old retired female doctor in nandanvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.