ग्रामीण भागात सक्रिय रुग्णांचा ग्राफ घसरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:10+5:302021-06-05T04:07:10+5:30
काटोल/कुही/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/कामठी/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. १३ ...
काटोल/कुही/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/कामठी/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सक्रिय रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. १३ तालुक्यात शुक्रवारी २०० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १५०९ वर आली. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ग्रामीण भागात २८०९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७३ (२.५९) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४२,२७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १,३८,०६५ कोरोनामुक्त झाले तर, २,२९७ रुग्णांचा मृत्यू झाला.
सावनेर तालुक्यात दोन रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. रामटेक ग्रामीणमध्ये एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ६,५२५ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६,३६४ कोरोनामुक्त झाले तर, १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६० इतकी आहे.
कुही तालुक्यात ९२ नागरिकांच्या चाचणी करण्यात आली. तीत वेलतूर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उमरेड तालुक्यातील ग्रामीण भागात दोन रुग्णांची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात पाच रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रात एक तर ग्रामीण भागात चार रुग्णांची नोंद झाली. यात खापरी, निमजी, तिष्टी (बु.) व तेलकामठी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ४०० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत काटोल शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ग्रामीण भागात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
हिंगणा तालुक्यात १५५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत वानाडोंगरी येथे चार, हिंगणा (३), जुनेवाणी, सावळी बिबी व टाकळघाट येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,९५५ रुग्णाची नोंद झाली. यातील ११,६७८ कोरोनामुक्त झाले तर, २७२ रुग्णांचा मृत्यू झाला. कामठी तालुक्यात १६२ रुग्णांची नोंद झाली. तीत १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.