काेराेना रुग्णांचा आलेख उतरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:08 AM2021-03-22T04:08:38+5:302021-03-22T04:08:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी/सावनेर/हिंगणा/रामटेक/कळमेश्वर/कन्हान/नरखेड/काटाेल : नागपूर जिल्ह्यात शनिवारच्या (दि. २०) तुलनेत रविवारी (दि. २१) काेराेना संक्रमित रुग्णांमध्ये थाेडी घट ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी/सावनेर/हिंगणा/रामटेक/कळमेश्वर/कन्हान/नरखेड/काटाेल : नागपूर जिल्ह्यात शनिवारच्या (दि. २०) तुलनेत रविवारी (दि. २१) काेराेना संक्रमित रुग्णांमध्ये थाेडी घट झाल्याने रुग्णांचा आलेख उतरला आहे. रविवारी विविध ठिकाणी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये कामठी तालुक्यात सर्वाधिक १३१ रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, सावनेर तालुक्यात ११९, हिंगणा तालुक्यात ६७, रामटेक तालुक्यात ४१, कळमेश्वर तालुक्यात १४, तर कन्हान शहर व नरखेड तालुक्यात प्रत्येकी १४ नवीन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे काटाेल शहरासह तालुक्यात एकाही नवीन रुग्णाची भर पडली नाही.
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १३१ रुग्ण कामठी तालुक्यात आढळून आले आहेत. यात कामठी शहरातील ४४, तर ग्रामीण भागातील ८७ रुग्णांचा समावेश आहे. नव्याने पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कामठी ४०, शहरातील छावणी परिसरातील चार तसेच तालुक्यातील महादुला येथील ४३, कोराडी येथील १६, पांजरा येथील सात, नांदा व येरखेडा येथील प्रत्येकी चार, खसाळा, वडोदा व गुमथळा येथील प्रत्येकी दोन आणि आजनी, केम, खापा (पाटण), टेमसना, भूगाव, रनाळा व सोनेगाव प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
सावनेर तालुक्यात ११९ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात सावनेर शहरातील ५२, तर तालुक्यातील विविध गावांमधील ६७ रुग्णांचा समावेश आहे. हिंगणा तालुक्यात ६७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. या नवीन रुग्णांमध्ये वानाडोंगरी शहरातील ३० रुग्णांसह हिंगणा शहरातील सहा, रायपूर व डेगमा (खुर्द) येथील प्रत्येकी चार, नीलडाेह, नागलवाडी, डिगडोह, इसासनी, अडेगाव व सावंगी-देवळी येथील प्रत्येकी तीन, वडधामना येथील दाेन आणि किन्ही-धानोली, संगम व गुमगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या ६७ रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण काेराेना रुग्णसंख्या ५,१२१ झाली असून, यातील ४,०८८ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत, तर १०९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.