जिल्ह्यात काेराेना रुग्णांचा आलेख उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:09 AM2021-05-10T04:09:32+5:302021-05-10T04:09:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड/उमरेड/सावनेर/कळमेश्वर/हिंगणा/काटाेल/रामटेक : नागपूर जिल्ह्यात मागील आठवड्याच्या तुलनेत काेराेना संक्रमण व रुग्णांचा आलेख कमी झाल्याचे दिसून आले ...

The graph of Kareena patients in the district came down | जिल्ह्यात काेराेना रुग्णांचा आलेख उतरला

जिल्ह्यात काेराेना रुग्णांचा आलेख उतरला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

नरखेड/उमरेड/सावनेर/कळमेश्वर/हिंगणा/काटाेल/रामटेक : नागपूर जिल्ह्यात मागील आठवड्याच्या तुलनेत काेराेना संक्रमण व रुग्णांचा आलेख कमी झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात रविवारी विविध ठिकाणी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये नरखेड तालुक्यात काेराेनाचे ८३ रुग्ण आढळून आले असून, उमरेड तालुक्यात ८१, सावनेर तालुक्यात ५३, कळमेश्वरमध्ये ५०, हिंगणा तालुक्यात ४९, काटाेलमध्ये ३३ तर रामटेकमध्ये २३ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली आहे.

नरखेड तालुक्यात रविवारी ८३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात नरखेड शहरातील १३, तर ग्रामीण भागातील ७० नवीन रुग्ण आहेत. या नवीन रुग्णांमध्ये सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये १० रुग्ण आढळून आले असून, जलालखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये २६, मेंढला प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये २६ तर माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये आठ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २,५७० झाली असून, यात ग्रामीण भागातील २,११८ तर नरखेड शहरातील ४५२ रुग्ण आहेत.

उमरेड शहरासह तालुक्यातील ८१ नागरिकांचे रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. या काेराेना संक्रमित रुग्णांमध्ये उमरेड शहरातील ३१, तर ग्रामीण भागातील ५० रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: The graph of Kareena patients in the district came down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.