जैन आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी यांचे महानिर्वाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:07 AM2021-03-05T04:07:57+5:302021-03-05T04:07:57+5:30
नागपूर : आचार्यश्री भरतसागरजी महाराज यांचे शिष्य आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचे बुधवार-गुरुवारच्या मध्यरात्री १.३५ वाजता छत्तीसगडमधील कुनकुरीपासून १८ ...
नागपूर : आचार्यश्री भरतसागरजी महाराज यांचे शिष्य आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचे बुधवार-गुरुवारच्या मध्यरात्री १.३५ वाजता छत्तीसगडमधील कुनकुरीपासून १८ किलोमिटर अंतरावरील चेटला गावामध्ये णमोकार महामंत्राची माळ जपत असताना महानिर्वाण झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या गृहस्थावस्थेतील नाव गेंदालाल जैन असून ते बांसवाडा (राजस्थान) येथील रहिवासी होते. ते आचार्यश्री सम्मेदशिखरजी यात्रेसाठी विहार करीत होते. कुनकुरी गावातच दुपारी अनेक भक्तजनांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.
आचार्यश्री पंचकल्याणकसागरजी महाराज यांचा २०२० चा वर्षायोग श्री दिगंबर जैन सेनगण मंदिर लाडपुरा इतवारी येथे झाला होता. मागील १५ जानेवारीला त्यांचा नागपूरहून सम्मेद शिखरजीकडे विहार झाला होता. त्यांनी दीक्षा स्वीकारल्यानंतर त्यागी जीवनात २० हजार किलोमीटर पदयात्रा केली. त्यांनी वर्षात ७२ उपवासांचा संकल्प केला होता. मात्र या वर्षी त्यांनी १२३ उपवास केले. १६ वर्षांपूर्वी त्यांनी आचार्यश्री भरतसागरजी महाराज यांच्याकडून २००५ मध्ये जैनेश्वरी दीक्षा घेतली होती. अखेरच्या काळात त्यांनी सर्व प्रकारच्या वस्तूंचा त्याग केला होता. मागील तीन दिवसांपासून सातत्याने प्रकृती खालावत असतानाही त्यांनी विहार सुरूच ठेवला होता.
...