महिलांना अन्न प्रक्रिया उद्योगात अपार संधी : निश्चय शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:46 PM2019-03-15T23:46:56+5:302019-03-15T23:48:34+5:30

देशात अन्न प्रक्रिया उद्योग वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या उद्योगात महिलांना अपार संधी आहे. डिक्कीने हजार महिलांना रोजगार देणाऱ्या अगरबत्ती क्लस्टरसाठी प्रयत्न केले. आता मिहानमध्ये फूड क्लस्टर स्थापनेसाठी जागेची मागणी केली असून महिलांचे उद्योग त्या ठिकाणी स्थापन होणार असल्याचे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या (डिक्की) पश्चिम भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके यांनी केले.

Great opportunities for women in the food processing industry: Nischay Shelke | महिलांना अन्न प्रक्रिया उद्योगात अपार संधी : निश्चय शेळके

महिलांना अन्न प्रक्रिया उद्योगात अपार संधी : निश्चय शेळके

googlenewsNext
ठळक मुद्दे डिक्कीतर्फे महिला उद्योजिका परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात अन्न प्रक्रिया उद्योग वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या उद्योगात महिलांना अपार संधी आहे. डिक्कीने हजार महिलांना रोजगार देणाऱ्या अगरबत्ती क्लस्टरसाठी प्रयत्न केले. आता मिहानमध्ये फूड क्लस्टर स्थापनेसाठी जागेची मागणी केली असून महिलांचे उद्योग त्या ठिकाणी स्थापन होणार असल्याचे प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीच्या (डिक्की) पश्चिम भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त डिक्कीच्या विदर्भ चॅप्टरतर्फे महिला उद्योजिकांसाठी ‘उद्योजकता विकास परिषदे’चे आयोजन हॉटेल सेंटर पॉईंट येथे शुक्रवारी करण्यात आले. व्यासपीठावर डिक्की महिला विंगच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सीमा कांबळे, जेट एअरवेजच्या कायदेविषयक सल्लागार मीनल नाईक, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ विपणन अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वयक ललिता दारोडकर, व्हीआयए लेडीज विंगच्या अध्यक्षा रिता लांजेवार, डिक्की महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष कांबळे, विदर्भाचे अध्यक्ष गोपाल वासनिक, डिक्की वेस्ट इंडियाचे बँकिंग विषयक सल्लागार विजय सोमकुंवर, डिक्की महाराष्ट्र महिला विंगच्या अध्यक्ष चित्रा उबाळे, राज्य मार्गदर्शक विनी मेश्राम, लोकमत सखी मंचच्या नेहा जोशी उपस्थित होते.
शेळके म्हणाले, महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी डिक्कीतर्फे मार्गदर्शन आणि मदत करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजिका व्हावेत. गोपाल वासनिक म्हणाले, शासनाच्या योजनेंतर्गत आणि डिक्कीच्या प्रयत्नांमुळे अनेकांना ट्रँकर आणि पेट्रोल पंप मिळाले आहेत. शिवाय अनेकांनी स्टार्ट अप योजनांचा लाभ मिळाला आहे. महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी डिक्कीतर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येते. महिला शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून उद्योग सुरू करून स्वत:च्या पायावर उभे राहावे. जितेंद्र डोंगरे यांनी उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. अन्न प्रक्रिया उद्योगात भरपूर संधी आहे. त्याचा महिलांनी लाभ घ्यावा.
सत्रांत राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, अन्न प्रक्रिया उद्योग आणि महिलांपुढील आव्हानांवर चर्चा करण्यात आली. यावेळी डिक्कीच्या यशस्वी महिला उद्योजिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डिक्कीच्या पदाधिकारी क्रांती गेडाम, रिता पोटपोसे, महिला उद्योजिका, महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Great opportunities for women in the food processing industry: Nischay Shelke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.