मोठा दिलासा; नागपूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे मृत्यूसत्र थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:06 AM2020-10-31T11:06:29+5:302020-10-31T11:06:54+5:30

corona Nagpur News प्रशासनाचे नियोजन व नागरिकांच्या सजगतेमुळे सलग तीन महिन्यानंतर शुक्रवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

Great relief; Corona's death stopped in rural Nagpur | मोठा दिलासा; नागपूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे मृत्यूसत्र थांबले

मोठा दिलासा; नागपूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे मृत्यूसत्र थांबले

Next
ठळक मुद्दे शहरात ३ मृत्यू : २९४ नव्या रुग्णांची नोंद

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाचे वाढते रुग्ण व मृत्यूच्या संख्येने नागपूर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण होते. विशेषत: मृत्यूच्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु प्रशासनाचे नियोजन व नागरिकांच्या सजगतेमुळे सलग तीन महिन्यानंतर शुक्रवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच शहरात ३ तर जिल्ह्याबाहेरील ४ अशा एकूण ७ मृत्यूची नोंद झाली. आज २९४ नव्या बाधितांची भर पडली. रुग्णसंख्या ९५,१९३ तर मृतांची संख्या ३,११७ झाली.

शहरात कोरोनाचा पहिला बळी ४ एप्रिल तर ग्रामीणमधील हिंगणा तालुक्यात ३० मे रोजी गेला. जुलै महिन्यात किरकोळ नोंद असताना ऑगस्ट महिन्यापासून शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूसत्राला सुरुवात झाली. सलग तीन महिने हे सत्र होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्ण व मृत्यूची संख्या कमी होऊ लागली होती. महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामीणमधील मृत्यूसत्र थांबल्याने व शहरातील मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. ग्रामीणमध्ये आतापर्यंत ५६५, शहरात २,१४० तर जिल्ह्याबाहेरील ४१२ रुग्णांचे मृत्यू झाले. आज ३८१ बाधित बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ८७,६४० झाली आहे. याचे प्रमाण ९२.०७ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या शहरात ४,४३६ रुग्ण क्रियाशील आहेत.

रॅपिडचाचण्यांची संख्या झाली कमी

जिल्ह्यात आज ५,०३९ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. इतर दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. यात रॅपिड  चाचण्यांची संख्या १,४८४ आहे. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या ३,५५५ आहे.  चाचण्यांमधून ३२ रुग्ण पॉझिटिव्ह तर १,४५२ रुग्ण निगेटिव्ह आले.

-आमदार निवासातील कोविड केअर सेंटर बंद!

आमदार निवासाला सुरुवातीला क्वारंटाईन नंतर कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात आले. सर्वाधिक रुग्ण याच सेंटरमध्ये होते. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात होताच आमदार निवासात नवे रुग्ण ठेवणे बंद झाले. गुरुवारी येथील २८ रुग्णांना सुटी देण्यात आल्याने शुकशुकाट होता. यामुळे हे सेंटर आता बंद करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उर्वरित पाचपावलीमध्ये ३६ तर व्हीएनआयटी कोविड केअर सेंटरमध्ये आठ रुग्ण आहेत.

 

Web Title: Great relief; Corona's death stopped in rural Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.