मोठा दिलासा, नागपुरात साडेअकराशेहून कमी रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:12+5:302021-05-17T04:07:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर-मागील महिन्यात कोरोनाची दाहकता झेलणाऱ्या नागपूर जिल्ह्याला या आठवड्यात बऱ्यापैकी दिलासा मिळतो आहे. रविवारी अनेक आठवड्यांनंतर ...

Great relief, less than one and a half hundred patients in Nagpur | मोठा दिलासा, नागपुरात साडेअकराशेहून कमी रुग्णसंख्या

मोठा दिलासा, नागपुरात साडेअकराशेहून कमी रुग्णसंख्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर-मागील महिन्यात कोरोनाची दाहकता झेलणाऱ्या नागपूर जिल्ह्याला या आठवड्यात बऱ्यापैकी दिलासा मिळतो आहे. रविवारी अनेक आठवड्यांनंतर शहरातील रुग्णसंख्या साडेअकराशेहून कमी नोंदविण्यात आली. तर नव्या बाधितांपेक्षा सुमारे चारपट कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील मृत्यूसंख्येतदेखील मोठी घट झाल्याचे दिसून आले.

रविवारच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात १ हजार १३३ रुग्ण आढळले. यातील ७२६ रुग्ण नागपूर शहरातील तर ३९६ रुग्ण ग्रामीण भागातील होते. या तुलनेत ठीक होणाऱ्यांची संख्या बरीच जास्त होती. २४ तासांत ४ हजार ५१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील २ हजार ७०५ रुग्ण शहरातील तर १ हजार ८१४ रुग्ण ग्रामीण भागातील होते. जिल्ह्यात ३० मृत्यूची नोंद झाली. यात शहरात ९, ग्रामीणमधील १० तर जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश होता. मृत्यूच्या संख्येत झालेली घट दिलासाजनक मानली जात आहे. २४ तासांत जिल्ह्यात १५ हजार ५५४ चाचण्या झाल्या. यात ग्रामीण भागातील ४ हजार ९३१ तर शहरातील १० हजार ६३४ चाचण्यांचा समावेश होता.

सक्रिय रुग्ण ३० हजारांखाली

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या तीस हजारांखाली नोंदविली गेली. रविवारी एकूण २९ हजार ८४३ सक्रिय रुग्ण होते. यातील १५ हजार १२ रुग्ण शहरातील तर १४ हजार ८३१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सक्रिय रुग्णांपैकी २३ हजार ५६ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत. तर विविध रुग्णालयांमध्ये ६ हजार ७८७ रुग्ण दाखल आहेत.

मागील दहा दिवसांतील आकडेवारी

दिनांक – नवे बाधित – बरे झालेले – मृत्यू

७ मे – ४,३०६ – ६,५२६ – ७९

८ मे – ३,८२७ – ७,७९९ – ८१

९ मे – ३,१०४ – ६,५४४ – ७३

१० मे – २,५३० – ६,०६८ – ५१

११ मे – २,२४३ – ६,७२५ - ६५

१२ मे – २,५३२ – ५,७०८ – ६७

१३ मे – २,२२४ – ५,८८४ - ७७

१४ मे – १,९९६ – ४,९६५ - ७०

१५ मे – १,५१० – ४,७८० - ४८

१६ मे – १,१३३ – ४,५१९ - ३०

Web Title: Great relief, less than one and a half hundred patients in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.