युवा व्यावसायिकाची उत्तुंग भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:11 AM2021-08-28T04:11:20+5:302021-08-28T04:11:20+5:30

वडील शेतकरी. व्यवसायासाठी कुणाचेही पाठबळ नसतानाही स्वत:च्या बळावर छोटासा व्यवसाय उभारून आता उत्तुंग शिखरावर नेणारे कार टायर व्यावसायिक संजय ...

The great rise of a young professional | युवा व्यावसायिकाची उत्तुंग भरारी

युवा व्यावसायिकाची उत्तुंग भरारी

googlenewsNext

वडील शेतकरी. व्यवसायासाठी कुणाचेही पाठबळ नसतानाही स्वत:च्या बळावर छोटासा व्यवसाय उभारून आता उत्तुंग शिखरावर नेणारे कार टायर व्यावसायिक संजय मोहोड यांच्या यशाची गाथा आगळीवेगळीच आहे. युवकांना प्रेरणा देणारी आहे. नोकरीच्या मागे न धावता स्वत:चा छोटासा व्यवसाय उभा करून जीवनात यशस्वी व्हावे, अशी त्यांच्या यशाची प्रेरणा आहे. नोकरी न करता नोकरी देणारे बनावे, असा त्यांचा मूलमंत्र आहे. हा तरुणांना निश्चितच प्रेरणा देणारा आहे. त्यांच्याशी चर्चेदरम्यान संजय मोहोड यांनी व्यवसायातील यशाचे अनेक टप्पे उलगडले. वेळेचे महत्त्व, समर्पक भावना आणि इमानदारीने व्यवसाय केल्यास यश हमखास मिळते, असा त्यांचा प्रेरणादायी संदेश आहे. तरुणांसाठी ते आयकॉन आहेत.

दहा बाय दहाच्या छोट्याशा दुकानातून सुरू केलेला टायर विक्रीच्या व्यवसायाचे मोठे स्वरूप झाले आहे. कोट्यवधींची वार्षिक उलाढाल आहे. सर्व मोठ्या देश-विदेशातील कंपन्यांचे ते मुख्य डीलर आहेत. अथर्व टायर्स प्रा.लि. कंपनीत संजय मोहोड आणि शुभांगी मोहोड संचालक आहेत. त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सक्षम केले आहे. कंपनीकडे शिक्षित व अनुभवी कर्मचारी आहेत. सर्व कर्मचाऱ्यांकडे वैयक्तिक लक्ष देत असल्याने त्यांना कुणीही सोडून जात नाही. सर्व जण आपुलकीने काम करतात. आपुलकी व अनुभवाच्या बळावर कोणत्याही व्यवसायात यश संपादन करता येते, असा त्यांचा अनुभव आहे.

संजय मोहोड म्हणाले, नोकरी करण्यापूर्वी व्यवसाय करण्याचीच प्रबळ इच्छा होती. अनुभवासाठी सन २००० मध्ये टायर व्यवसायात नोकरीला लागलो. अमेरिकन कंपनी ‘गुड इयर लिमिटेड’मध्ये एरिया सेल्स मॅनेजर पदावर, शिवाय वेगवेगळ्या टायर कंपनीत काम केले. नोकरी सोडून २००७ मध्ये वाडी येथील दहा बाय दहाच्या खोलीत स्वत:च्या पैशातून होलसेल टायर विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आता याच ठिकाणी पाच हजार चौरस फूट जागेत टायरचे गोडाऊन आहे. हजारो कार टायरचा स्टॉक आहे. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि छत्तीसगडमध्ये डीलरला टायरचे वितरण करण्यात येते. बहुराष्ट्रीय कंपन्या ब्रिजस्टोन, गुड इयर, मिशिलिन, युकोहोमा, अल्ट्रामाईलचे विदर्भाचे मुख्य वितरक असून, सर्वच कंपन्यांच्या टायरची विक्री करतो. अमरावती रोड वाडी, घाट रोड मोक्षधाम चौक, शताब्दी चौक व अकोल्यात जुन्या आरटीओ कार्यालयासमोर स्वत:चे चार रिटेल आऊटलेट असून, आधुनिक उपकरणांच्या मशीनरी, सर्व व्हेरायटी आणि हाय एन्ड कार टायर्स, सोबतच प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी ही आमची शक्ती आणि गुणवत्तेची हमी देण्यात येते. टायर व्यवसायामध्ये २१ वर्षांचा दीर्घ अनुभव असून, अनेक मोठमोठ्या देशांचा प्रवास केला आहे.

मोहोड म्हणाले, मर्सिडिज, बीएमडब्ल्यू आणि सर्व मोठ्या कंपन्यांचे टायर अथर्व टायर्समध्ये मिळतात. ७० टक्के होलसेल तर ३० टक्के रिटेल व्यवसाय असून, विदर्भातील सर्वात मोठे टायर वितरक आहेत. कोविड काळात ग्राहकांना घरपोच टायर वितरण आणि सेवा करीत व्हॅन तयार केली असून, त्याद्वारे टायर फिटिंग, बॅलेन्सिंग, नायट्रोजन एअर आणि अन्य सुविधा देण्यात येते. अशा प्रकारची सेवा मुंबई, पुणेनंतर नागपुरात पहिल्यांदा देण्यात येत आहे. नामांकित मोठ्या कंपन्यांच्या हाय एन्ड टायरसाठी पहिल्यांदा अथर्व टायर्सकडे विचारणा होते, हेच आमच्या यशाचे श्रेय आहे.

अथर्व टायर्स प्रा.लि. कंपनीला रिटेलमध्ये विस्तार करायचा आहे. आमच्याकडे टायरच्या भरपूर व्हेरायटी आहेत. शिवाय दरही परवडणारे असल्यामुळे ग्राहक संख्येत दररोज वाढ होतच आहे.

या व्यवसायात अनेक जण पिढ्यान्पिढ्या काम करणारे व्यावसायिक आहेत. आमचा व्यवसाय केवळ १५ वर्षांपूूर्वीचा आहे. दिवस-रात्र मेहनत आणि इमानदारीच्या भरवशावर मोठ्या व्यावसायिकांमध्ये आदराचे स्थान मिळविले आहे. व्यवसाय उभा करण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले. अर्ध्या भारतात या क्षेत्रातील लोक मला ओळखतात. हीच माझ्या यशस्वी व्यवसायाची पावती असल्याचे मोहोड म्हणाले. इमानदारीने व्यवसाय करून नाव कमविल्याचे ते अभिमानाने सांगतात.

डीलर्सचे व्यक्तिगत संबंध जोपासण्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्यामुळे व्यवसायात निश्चितच भर पडते आणि व्यवसायातील त्रुटी माहीत होतात. नोकरी करताना खरेदी व विक्रीचा अनुभव होता. त्याचा फायदा व्यवसायात होत असल्याचे त्यांचे मत आहे. व्यवसाय करताना अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतानाच व्यवसायातही मदत केली आहे. मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. कोविड काळात सामाजिक सेवांना महत्त्वसुद्धा दिले आहे.

पत्नी शुभांगी, मुलगा अथर्व, मुलगी अनुष्का असा परिवार असून, आजपर्यंत व्यवसायात अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत.

Web Title: The great rise of a young professional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.