नागपुरात तीन महिन्यासाठी ग्रीन बसचा प्रवास स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:37 AM2018-04-04T00:37:46+5:302018-04-04T00:37:56+5:30

इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवास भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ६ एप्रिलपासून नवीन दर लागू करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे.

Green bus journeys in Nagpur for three months is cheap | नागपुरात तीन महिन्यासाठी ग्रीन बसचा प्रवास स्वस्त

नागपुरात तीन महिन्यासाठी ग्रीन बसचा प्रवास स्वस्त

Next
ठळक मुद्देदोन रुपयांची भाडे कपात : ६ एप्रिलपासून लागू होणार नवीन दर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इथेनॉलवर धावणाऱ्या महापालिकेच्या ग्रीन बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशांचा प्रतिसाद वाढावा. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यासाठी ग्रीन बसच्या प्रवास भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. ६ एप्रिलपासून नवीन दर लागू करण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला आहे.
सध्या शहरातील विविध मार्गावर २५ ग्रीन बसेस धावतात. या बसेस वातानुकूलित असूनही प्रवाशांचा या बसेसला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. फेब्रुवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ग्रीन बसच्या ३३,२५१ फेºया झाल्या. या बसेस ६,२१,०५७ किलोमीटर धावल्या. यातून ३३,००३९ प्रवाशांनी प्रवास केला. प्रत्येक बसमधून सरासरी ९.९३ प्रवाशांनी प्रवास केला, म्हणजे १०पेक्षाही कमी प्रवासी होते. ही संख्या फारच कमी असल्याने ग्रीन बसचा तोटा वाढत आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढविण्याची गरज आहे. यासाठी प्रवासी भाड्यात दोन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी मंगळवारी दिली. याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर हा प्रस्ताव सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. त्यानंतरही हेच दर नेहमीसाठी कायम ठेवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. दरकपातीमुळे प्रवाशांची संख्या वाढेल. दर कमी केल्याने तोटा वाढणार नाही. उन्हाळ्याचे दिवस विचारात घेता वातानुकूलित बसला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी व्यक्त केला.

बसमध्ये लावणार एलईडी टीव्ही
ग्रीन बसचा तोटा कमी करण्यासाठी या बसवर तसेच बसमध्ये जाहिरात केली जाईल. यासाठी बसमध्ये एलईडी टीव्ही लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या जाहिरातीमधून उत्पन्न मिळेल. तसेच ग्रीन बसच्या सांैदर्याला बाधा न आणता बसवर जाहिरात करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाणार असल्याची माहिती बंटी कु कडे यांनी दिली.

वर्षभरात ४.३९ कोटींचा तोटा
वर्षभरात ग्रीन बस ६,२१,०५७ किलोमीटर धावली. प्रति किलोमीटर ८५ रुपयेप्रमाणे आॅपरेटला देण्यात आले. याचा विचार करता महापालिकेने ग्रीन बसवर ५ कोटी २७ लाख ८९ हजार ८४५ रु पये खर्च केला. प्र्रवासी उत्पन्नातून मात्र ८८ लाख १७ हजार ९ रुपयांचा महसूल जमा झाला; म्हणजेच वर्षभरात ४ कोटी ३९ लाख ७२ हजार ८३६ रुपयांचा तोटा झाला.

 

Web Title: Green bus journeys in Nagpur for three months is cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.