‘माझी मेट्रो’ला हिरवा कंदील; ट्रायल रन, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 03:33 AM2017-10-01T03:33:06+5:302017-10-01T03:33:15+5:30

दस-याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या ५.६ कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवा झेंडा दाखविला.

Green lantern to my metro; Trial run, Chief Minister Fadnavis, Union Minister Gadkari's presence | ‘माझी मेट्रो’ला हिरवा कंदील; ट्रायल रन, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती

‘माझी मेट्रो’ला हिरवा कंदील; ट्रायल रन, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती

Next

नागपूर : दस-याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत मेट्रो रेल्वेच्या ५.६ कि़मी.च्या पहिल्या ‘ट्रायल रन’ला हिरवा झेंडा दाखविला. गोंदिया येथील महिला ड्रायव्हर सुमेधा मेश्राम यांनी ‘माझी मेट्रो’ चालविली.
नागपूर मेट्रो रेल्वे तिच्या निर्धारित वेळापत्रकानुसार सेवेत दाखल होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर नितीन गडकरी, ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
‘माझी मेट्रो’मुळे जवळपास २० हजार लोकांना रोजगार मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपुरात मेट्रो रेल्वे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण ३८ कि़मी. धावणार आहे. पुढे कन्हान, हिंगणा आणि बुटीबोरीपर्यंत धावेल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपुरात अजनी येथे पॅसेंजर हब आणि खापरी येथे लॉजिस्टिक हबची निर्मिती करण्यात येणार असून, काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

महाकार्डचे उद्घाटन
मेट्रो, सिटी बस, पार्किंग, मॉल आणि सर्व ठिकाणी उपयोगात येणाºया मेट्रो रेल्वेच्या रूपे महाकार्डचे उद्घाटन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्ष अरुधंती भट्टाचार्य यांच्या हस्ते झाले. या कार्डला ‘सर्वत्र’ म्हणून संबोधण्यात आले. यासाठी स्टेट बँकेने २०० कोटी रुपये महामेट्रोला दिले आहेत.

Web Title: Green lantern to my metro; Trial run, Chief Minister Fadnavis, Union Minister Gadkari's presence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो