तरुणोत्सव पर्वावर देश-विदेशात झाले हरितक्रांती वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:23+5:302021-07-07T04:09:23+5:30
नागपूर : राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या ५४ व्या तरुणोत्सव अवतरण पर्वाच्या निमित्ताने देश-विदेशात हरितक्रांती वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. ...
नागपूर : राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागरजी महाराज यांच्या ५४ व्या तरुणोत्सव अवतरण पर्वाच्या निमित्ताने देश-विदेशात हरितक्रांती वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.
नागपुरात हे अभियान अहिंसावादी राष्ट्रीय महासंघटन व तरुण क्रांती मंच गुरू परिवाराच्या वतीने राबविण्यात आले.
तरुणोत्सवाच्या पर्वावर पुढील ५४ दिवसांत ५४ हजार रोपट्यांचे रोपण तरुण क्रांती मंचच्या वतीने भारतासह अमेरिका, इंग्लंड, दुबई, बहारिन, लॉस एंजलिस आदी विविध देशांमध्ये करण्यात येणार आहे. नागपुरात या अभियानासाठी तरोडी (बु.) हे गाव निश्चित करण्यात आल्याची माहिती तरुण क्रांती मंच नागपूरचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ व प्रवक्ता अभय शाहाकार यांनी दिली. या अभियानाची सुरुवात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते नागपूरच्या राजभवन येथे २४ रोपट्यांचे रोपण करून करण्यात आली होती. हरितक्रांती वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे उपसभापती म्हणून आशिष मल्लेवार, समाजसेवक सुमंत लल्ला, तरोडी (बु.)चे सरपंच अरविंद फुलझेले, जगेश खापरे, नितीश भरडभुंजे यांच्यासह शिवणकर, राजकुमार पटले, दिलीप भरडे, राजेंद्र गुहे, राजू घाटाेळे, ममता जैन, वैशाली भरडे, सपना काळे, मुस्कान, अंशिता क्षीरसागर, वेदांत काळे, कविता उबाळे, नंदा, उषा उपस्थित होते. संचालन डॉ. चंद्रनाथ भागवतकर यांनी केले. आभार अनुज शाहाकार यांनी मानले.
................