हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 08:57 PM2019-07-01T20:57:08+5:302019-07-01T21:01:08+5:30

हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रामगिरी येथे त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासोबतच विविध शासकीय कार्यालये आणि सामाजिक संघटनांच्यावतीनेही त्यांना अभिवादन करण्यात आले.

Green Revolutionary Vasantrao Naik greeted by Chief Minister | हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रामगिरी येथे त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासोबतच विविध शासकीय कार्यालये आणि सामाजिक संघटनांच्यावतीनेही त्यांना अभिवादन करण्यात आले.
रामगिरीवरील कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, उपजिल्हाधिकारी शिरीष पांडे, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे तसेच इतर मान्यवरांनी गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.
विभागीय आयुक्त कार्यालय
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात उपायुक्त(नियोजन) धनंजय सुटे यांनी वसंतराव नाईक यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त के.एन.के. राव, मागासवर्गीय सहायक आयुक्त मनीषा जायभाये तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांनी गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, अविनाश कातडे, सुजाता गंधे, तहसीलदार सुधाकर इंगळे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी यांनी गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.
विधानभवन
विधानभवन येथील वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महानगरपालिका सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बंजारा समाज प्रमुख नायक आत्माराम चव्हाण, संघटनेचे कारभारी शालिक राठोड, नगरसेविका प्रगती पाटील, तसेच अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Web Title: Green Revolutionary Vasantrao Naik greeted by Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.