ग्रीन व्हिजिल बनली अर्थ इको इंटरनॅशनलची ग्लोबल पार्टनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:11 AM2018-12-01T01:11:10+5:302018-12-01T01:13:18+5:30

अमेरिकेतील प्रसिद्ध पर्यावरण संस्था अर्थ इको इंटरनॅशनलने नागपूरच्या ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेला ग्लोबल पार्टनर बनविले आहे. अर्थ इको इंटरनॅशनलचे सेन रुसेल यांनी संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्याशी ‘ग्लोबल पार्टनरशीप अ‍ॅग्रीमेंट’ वर हस्ताक्षर केले आहे.

Green Visil become Earth Echo International's Global Partner | ग्रीन व्हिजिल बनली अर्थ इको इंटरनॅशनलची ग्लोबल पार्टनर

ग्रीन व्हिजिल बनली अर्थ इको इंटरनॅशनलची ग्लोबल पार्टनर

googlenewsNext
ठळक मुद्देभारतातून केवळ एकमेव संस्था : २०१२ पासून करतेय तलावांचे परीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिकेतील प्रसिद्ध पर्यावरण संस्था अर्थ इको इंटरनॅशनलने नागपूरच्या ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेला ग्लोबल पार्टनर बनविले आहे. अर्थ इको इंटरनॅशनलचे सेन रुसेल यांनी संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांच्याशी ‘ग्लोबल पार्टनरशीप अ‍ॅग्रीमेंट’ वर हस्ताक्षर केले आहे.
अर्थ इको इंटरनॅशनल गेल्या काही वर्षांपासून जगातील नदी व तलावांच्या पाण्याचे परीक्षण व निरीक्षण करते. या निरीक्षणातून ‘वॉटर मॉनेटरींग चॅलेंज इअर बुक’ प्रकाशित करते. यात जगभरातील हजारो संस्था आपल्या शहर व गावातील नदी व तलावांचा डाटा पाठवितात. ग्रीन व्हिजिल सुद्धा २०१२ पासून शहरातील तलावांच्या पाण्याचे परीक्षण करून त्याचा डाटा ‘अर्थ इको इंटरनॅशनल’ ला पाठवित आहे. गेल्या आठ वर्षात ग्रीन व्हिजिलने केलेल्या तलावांच्या पाण्याच्या परीक्षण व विश्लेषणाची प्रशंसा अर्थ इकोने केली आहे. यावर्षी नागपूरच्या ग्रीन व्हिजिलला ग्लोबल पार्टनर बनविले आहे.
आतापर्यंत अर्थ इकोने जगभरातील केवळ २८ संस्थांना ग्लोबल पार्टनर बनविले आहे. भारतातून ग्रीन व्हिजिल ही एकमेव संस्था अर्थ इकोशी जुळली आहे. अर्थ इकोने ग्रीन व्हिजिलला कराराच्या प्रमाणपत्राबरोबरच अत्याधुनिक परीक्षण कीट पाठविलेली आहे. ज्याद्वारे उत्तम प्रकारे नद्या व तलावांची चाचणी केली जाईल.
ग्रीन व्हिजिल संस्थेचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी सांगितले की, जगप्रसिद्ध पर्यावरणवादी संस्थेद्वारे ग्लोबल पार्टनर निवडले जाणे ही शहरासाठी गौरवाची बाब आहे.

Web Title: Green Visil become Earth Echo International's Global Partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.