अत्यावश्यक सेवेतील सर्व हिरोंना तरुणाईचा सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:43 PM2020-04-11T17:43:32+5:302020-04-11T17:46:14+5:30
कोरोना संसर्गाच्या काळात समाजाकरिता अत्यावश्यक सेवा पुरवीत असलेले डॉक्टर, शास्त्रज्ञ, सरकारी कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदी सर्वजण खरे हिरो आहेत, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त करीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या सर्वांना ‘सलाम’ केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संसर्गाच्या काळात समाजाकरिता अत्यावश्यक सेवा पुरवीत असलेले डॉक्टर, शास्त्रज्ञ, सरकारी कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदी सर्वजण खरे हिरो आहेत, अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त करीत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या सर्वांना ‘सलाम’ केला आहे. तसेच, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी नागपूरकरांना करीत आम्ही गरजूंच्या मदतीसाठी सज्ज आहोत, असेही म्हटले आहे.
‘वुई आर ऑल इन धीस टुगेदर लव्ह सो प्लीज स्टे अॅट होम अॅण्ड हेल्प अस स्टॉप द स्प्रेड..स्टे होम’ असे प्रत्येकाने एक शब्द हाती घेतलेले फलक ‘सोशल मिडिया’वर एकत्र करून ते व्हायरल करण्यात आले आहेत. त्यांच्या या अभिनव संकल्पनेचे कौतुक होत आहे, असे या ग्रुपची सदस्य किंजल कुलकर्णी म्हणाली. तिच्यासोबत या ग्रुपमध्ये शहरातील वेगवेगळ््या महाविद्यालयात असलेले सौरभ माहुरे, रोहिणी प्रधान, सुवर्णा रायपुरे, श्रीया गुजर, ऋतूजा भोयर, यश बावने, साहिल वाघमारे, गौरव नेमाडे ही मित्रमंडळी आहेत. आता सुट्यांचाच कालावधी असल्याने आम्हा तरुणाला गरजूंच्या मदतीसाठी धावण्याची इच्छा होत आहे. त्या संकल्पनेतून हा ग्रुप ‘सोशल मिडिया’वर सक्रिय झाला आहे. गरजूंना अन्नदान व वैद्यकीय सुविधांविषयी मार्गदर्शन, औषधींचे वितरण करण्यासाठी आम्ही मदत करीत आहोत, ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्वांना मदत करण्यासाठी आमचा ग्रुप सक्रिय राहील, असेही किंजल म्हणाली.