अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात बाबासाहेबांना अभिवादन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:05 AM2020-12-07T04:05:02+5:302020-12-07T04:05:02+5:30
नागपूर : अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाच्या मागासवर्गीय समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ...
नागपूर : अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाच्या मागासवर्गीय समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गजानन पाटील हे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या कालावधीत जन्मले तो संघर्षाचा काळ होता. स्थिती अतिशय बिकट होती. अशा काळात बाबासाहेबांनी संघर्ष केला व स्वातंत्र्य-समता-बंधूता या तत्त्वाचा विकासमंत्र भारतीय समाजाला दिला. त्यांनी भारतीयांच्या प्रगतीचे स्वप्न पाहिले व त्यासाठी ते जगले. प्रत्येक काळाच्या कसोटीवर खरे ठरणारे लेखन बाबासाहेबांनी केले. प्रत्येक भारतीयाने त्यांच्या लेखनातून प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. गजानन पाटील यांनी केले. प्रा. धीरज अंबाडे यांनी संचालन केले. डॉ. भगवान नन्नावरे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.