बॅरिस्टर खाेब्रागडे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:10 AM2021-09-26T04:10:25+5:302021-09-26T04:10:25+5:30

रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे माणसपुत्र म्हणून ओळख असलेले आंबेडकरी चळवळीचे सेनापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९६ ...

Greetings to Barrister Khaebragade | बॅरिस्टर खाेब्रागडे यांना अभिवादन

बॅरिस्टर खाेब्रागडे यांना अभिवादन

Next

रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे माणसपुत्र म्हणून ओळख असलेले आंबेडकरी चळवळीचे सेनापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. इंदाेरा चाैकस्थित त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बँकेचे संचालक अशोक कोल्हटकर, डॉ. अनमोल टेंभुर्ण, राजकुमार वंजारी, दिलीप तांदळे, चरांजीत जबबंधू, डॉ. प्रमोद चिंचखेडे, संजीव वालदे, दिनेश घरडे, राजेश राईपुरे, आदी उपस्थित हाेते.

रिपब्लिकन आघाडी

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त इंदोरला स्थित त्यांच्या पुतळ्याला रिपब्लिकन आघाडीतर्फे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संजय जीवने, प्रा. राजेंद्र टेंभुर्णी, घनश्याम फुसे, संजय पाटील, दिनेश अंडरसहरे, सचिन गजभिये, सुनील जवादे, शेषराव रोकडे, उमेश गजभिये, सागर डबरासे, धम्मपाल वंजारी, शेषराव गणवीर, प्रशिक आनंद, निखिल कांबळे, कमलेश मेश्राम, आशिष मेश्राम, प्रशांत मेश्राम, मनोज गजभिये, सोमय्या कुमरे, संजीवन वालदे, पी.एम. गौरखेडे, सुनील शेंडे, सुनील जांभुळकर, सुदर्शन मून, दीपक वालदे, नवनीत मोटघरे, विकास लोखंडे, आदी उपस्थित होते.

बहुजन समाज पार्टी

बॅरिस्टर राजाभाऊ खाेब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त बसपातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. बसपाचे शहर सचिव उमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात इंदाेरा चाैक येथील पुतळ्याला मालार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी मनपा पक्षनेता जितेंद्र घोड़ेस्वार, नगरसेविका वैशाली नारनवरे, माजी जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर उपस्थित हाेते.

Web Title: Greetings to Barrister Khaebragade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.