माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:53+5:302021-07-02T04:06:53+5:30
नागपूर : हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये व सामाजिक संघटनांतर्फे अभिवादन ...
नागपूर : हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये व सामाजिक संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले.
-विधान भवन
हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन येथे आमदार निलय नाईक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सहायक अभियंता संजय सतदेवे, कक्ष अधिकारी कैलास पझारे, प्रा. मोहन चव्हाण, तुकाराम चव्हाण, शिक्षणाधिकारी श्रीराम चव्हाण, अजय पाटील, श्रीकांत राठोड, अजय चव्हाण, धुलसिंग राठोड, उदल राठोड, मुकुंद आडेवार, डॉ. के.झेड. राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
- विभागीय आयुक्त कार्यालय
हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त चंद्रभान पराते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
साहाय्यक आयुक्त हरीश भामरे, तहसीलदार अरविंद सेलोकर, प्रताप वाघमारे, नायब तहसीलदार आर.के. दिघोळे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही या वेळी उपस्थित होते.
-जिल्हाधिकारी कार्यालय
हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उपजिल्हाधिकारी विजया बनकर, तहसीलदार सुधारकर इंगळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
- महावितरण
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना महावितरण कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमांत नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. या वेळी अधीक्षक अभियंता अजय खोब्रागडे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर, प्रज्वला किरनाके, सहायक महाव्यस्थापक प्रदीप सातपुते, प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, सचिन लहाने या वेळी उपस्थित होते.