महामानवाला भावपूर्ण अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:14+5:302021-04-15T04:08:14+5:30
रिपब्लिकन आघाडीतर्फे संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली. बाबासाहेबांचा जयजयकार करीत पटवर्धन ...
रिपब्लिकन आघाडीतर्फे संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली. बाबासाहेबांचा जयजयकार करीत पटवर्धन ग्राउंड येथे डॉ. आंबेडकर यांचे जन्मशताब्दी स्मारक तातडीने बनवावे, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी संजय पाटील, दिनेश अंडरसाहारे, सचिन गजभिये, प्रमोद वंजारी, दीपक वालदे, शेषराव गणवीर, सुनील जवादे, भीमराव बिसांद्रे, विकास लोखंडे आदी उपस्थित हाेते.
जयभीम चाैक विकास समिती ()
जयभीम चौक विकास समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना देण्यात आली. यावेळी अध्यक्ष धरमपाल वंजारी, सचिव बुद्धीवान सुखदेवे यांच्यासह विलास कांबळे, मयूर मेश्राम, नितीन सोमकुवर, प्रतीक वंजारी, सरिता सांगोडे, पृनय वासनिक, वंदना जांभुळकर, हिराबाई गवळी, मनोहर खोब्रागडे, भाऊराव ऊके, सुनील थोरात, डी. एच. वाघमारे, सांकी कोडागुरले, आकाश वासनिक, अथर्व सांगोडे, अजय वासनिक, गोविद भोयर आदी उपस्थित हाेते.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच
बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्यावतीने मंचच्या संयोजिका व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बरिएमंच्या नगरसेविका व धंतोली झोनच्या सभापती वंदना भगत, जिल्हा अध्यक्ष संदीप कांबळेे, नगरसेविका सावला सिंगाडे, सुभाष सोमकुवर, भरत जवादे, उदास बंसोड, आनंद नाईक, नागसेन चोखांद्रे, गुड्डू निखारे, दीपंकर गणवीर, शामला मस्के, शैलेजा डोंगरे, नरेंद्र चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसमोर महानवाच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांच्यासह सरचिटणीस नरेंद्र धनविजय, डी.डी. शेंडे, नरेंद्र मेश्राम, बापूसाहेब खोब्रागडे, हरीश डोफे, संजय मलके, नरेश वाघाडे आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्हा परिषद
नागपूर जिल्हा परिषदेतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन व पंचायत) राजेंद्र भुयार, उच्च श्रेणी लघुलेखक डॉ. सोहन चवरे, बी.के. खोब्रागडे आदी उपस्थित होते.