रामटेक येथे महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:58+5:302021-04-15T04:07:58+5:30

रामटेक : पंचायत समिती कार्यालयात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ...

Greetings to Mahamanwala at Ramtek | रामटेक येथे महामानवाला अभिवादन

रामटेक येथे महामानवाला अभिवादन

Next

रामटेक : पंचायत समिती कार्यालयात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सागर वानखेडे, जगणे, मडावी, खेवले, येल्लूरे, बलदेव, ईश्वर मलघाटे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. तालुक्यातील काचूरवाही गट ग्रामपंचायत येथे सरपंच शैलेश राऊत यांच्या हस्ते माल्यार्पण करून महामानवास अभिवादन करण्यात आले.

....

ग्रामपंचायत सातनवरी

धामणा : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सातनवरी ग्रामपंचायत येथे अतिशय साधेपणाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली गेली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच विजय चाैधरी यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी निर्मला मोरे, शरद काटोके, ऋषिकेश भोगे, अतुल गोतमारे, संजय भोगे, मोरेश्वर बोरजे व नागरिक उपस्थित हाेते.

श्रावस्ती बुद्धविहार वागदरा गुमगाव

गुमगाव : वागदरा नवीन गुमगाव येथील श्रावस्ती बुद्धविहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानवाच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी वामन वाळके, सरपंच प्रेमनाथ पाटील, बीट जमादार अरविंद घिये, अशोक पाटील, अरविंद वाळके, मधुसूदन चरपे, रवींद्र कुंभारे, राजू धाबर्डे, पंकज गोटे, मनुकला वाळके, कल्पना गजघाटे, श्रद्धा बागडे, चंदू हाडके, किशोर खोब्रागडे, विजय जाधव, संजय वाळके, सुखदेव खोब्रागडे, वनवास गजघाटे आदी उपस्थित होते. यावेळी निरंजन वासे व गौतम मोडक यांच्यातर्फे नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सिंग व शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. नागरिकांनी घरीच बुद्धवंदना व पंचशील ध्वज लावून महामानवाला अभिवादन केले.

Web Title: Greetings to Mahamanwala at Ramtek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.