महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
By Admin | Published: October 3, 2015 02:52 AM2015-10-03T02:52:04+5:302015-10-03T02:52:04+5:30
जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती शहरात विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी साजरी केली.
नागपूर : जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसानचा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती शहरात विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी साजरी केली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शाळांमध्ये महात्मा गांधीच्या जीवनावर मार्गदर्शन कार्यक्रम साजरे झाले.
महात्मा गांधी यांना राजभवनात अभिवादन
राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालय
विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त अप्पासाहेब धुळाज प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हधिकारी गिरीश जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते.
श्री गजानन महाराज मारोती देवस्थान समिती
शांतीनगर, श्री गजानन महाराज मारोती देवस्थान समितीने गांधी जयंती व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांच्या सहकार्यातून जैन मंदिरासमोरील परिसर स्वच्छ केला. श्रमदानात स्थानिक महिला, पुरुष व मुलेही सहभागी झाले होते. यावेळी संस्थेचे सुनील गाढवे, प्रशांत जिभकाटे, संजय नवथरे, श्रीपती पटेल, राजू गाडगे, दिपक पटले, परमानंद बोपचे आदी सहभागी झाले होते. अभियानास झोन सभापती रामदास गुडधे, नगरसेविका कोवे यांनी नागरिकांना प्रोत्साहित केले.
सम्यक ज्येष्ठ नागरिक मंच
गांधी जयंतीचे औचित्य साधून सम्यक ज्येष्ठ नागरिक मंचच्या पदाधिकारी व सदस्यांनी श्रमदान करून कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. नगरसेवक संदीप सहारे व महापालिकेच्या आरोग्यविभागाने या कार्यात सहकार्य केले.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविले. अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, अनिल सोले, नगरसेविका सारिका नांदुरकर, रिता मुळे, माजी नगरसेवक कैलास चुटे उपस्थित होते. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांच्याहस्ते गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
महावितरण
महावितरणच्या प्रकाश भवन येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी अधीक्षक अभियंता नागपूर शहर मंडळ सुरेश मडावी, अधीक्षक अभियंता आर. एम. बुंदिले, सहा. महाव्यवस्थापक सत्यजित राजेशिर्के, कार्यकारी अभियंता प्रशांत सराफ, सुनील साळवे, पी.एस. तगलपल्लीवार, अनिल बाकोडे, श्वेता जानोरकर व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.