महात्मा जोतिबा फुले यांना विनम्र अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:07 AM2021-04-12T04:07:09+5:302021-04-12T04:07:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिबा फुले यांची १९४ वी जयंती उत्साहात साजरी झाली. शासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिबा फुले यांची १९४ वी जयंती उत्साहात साजरी झाली. शासनाने लॉकडाऊन घोषित केले असल्याने विविध संघटनांनी नियमांचे पालन करीत म. फुले यांच्या फुले मार्केट परिसरातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यासोबतच विविध सामाजिक संघटनांच्या कार्यालयातही अभिवादन करण्यात आले.
बहुजन समाज पार्टी ()
सामाजिक क्रांतीचे जनक, बाबासाहेबांचे गुरू, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांची जयंती बसपातर्फे साजरी करण्यात आली. पक्षाचे प्रदेश कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात रविवारी महात्मा फुले मार्केट परिसरातील फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, जिल्हा सचिव अभिलेश वाहणे, सागर लोखंडे, माजी पक्षनेता गौतम पाटील, दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष सदानंद जामगडे, राजेश खांडेकर, मनोज निकाळजे, प्रवीण पाटील, चंद्रशेखर कांबळे, योगेश लांजेवार, प्रकाश फुले, विलास पाटील, शंकर थुल, बुद्धम राऊत, इंजि. राजीव भांगे, सुबोध साखरे, सुरेंद्रपाल सिंग, सादाब खान, विवेक सांगोळे, अशोक मंडपे, परेश जामगडे आदी उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच ()
विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे क्रांतिवीर महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नगरसेविका सावला सिंगाडे, तसेच पदाधिकारी सुभाष सोमकुवर, उदास बंसोड, दीपंकर गणवीर, सागर भावे, मयूर पाटील, चंदू कापसे, सुनील वानखेडे, भीमराव आळे आदी उपस्थित होते.