शिवरायांना ठिकठिकाणी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:25 AM2021-02-20T04:25:12+5:302021-02-20T04:25:12+5:30

कन्हान : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कन्हान (ता. पारशिवनी) शहरात विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

Greetings to Shivaraya everywhere | शिवरायांना ठिकठिकाणी अभिवादन

शिवरायांना ठिकठिकाणी अभिवादन

Next

कन्हान : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कन्हान (ता. पारशिवनी) शहरात विविध संघटनांच्यावतीने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात शिवरायांच्या प्रतिमा व पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

नजीकच्या टेकाडी (ता. पारशिवनी) येथील ब्लॅक डायमंड साेसायटीच्यावतीने आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला साेसायटीचे अध्यक्ष चंद्रमणी भेलावे, नरहरी पोटभरे, यशवंत बर्वे, पारसनाथ दुबे, संजय चव्हाण, यशंवत हांडेकर, सुरेश यादव, अशोक गुडघे, प्रमोद द्विवेदी, कृष्णकुमार पिल्ले, अमित हाडके, सुरेंद्र ठाकरे, विनोद सिरिया, विनोद हुमने, पी. बी. सेलोकर उपस्थित होते. शिवसेनेतर्फे आयाेजित कार्यक्रमाला कन्हानच्या नगराध्यक्ष करुणा आष्टनकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, नगरसेवक डायनल शेंडे, अनिल ठाकरे, सुनील आष्टनकर, छोटू राणे, हरीश तिडके, अनिल लोंढे उपस्थित होते. यावेळी अतिथींच्या हस्ते निराधार महिलांना उपजीविकेसाठी शिलाई मशीन भेट देण्यात आल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने कन्हान शहरातील सुरेश नगरात कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी चंद्रशेखर भिमटे, अशोक पाटील, अंबादास खंडारे, मोरेश्वर खडसे, नरेश सोनेकर, भीमराव उके, विवेक पाटील, कुणाल यादव, योगेश पोटभरे, असीम नसकर, राहुल पाटील, नकीब आजाद, बाळू हटवार, राजू वैरागडे उपस्थित होते.भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे, अतुल हजारे, डाॅ. मनोहर पाठक, जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे, रामभाऊ दिवटे, जयराम मेहरकुळे, मूलचंद शिंदेकर, भरत सावळे, विजय हटवार, राजेंद्र शेंद्रे, सुनील लाडेकर, अमोल साकोरे, सौरभ पोटभरे, अजय लोंढे, मनोज कुरटकर, संजय चोपकर, शैलेश शेळके, आनंद शर्मा, अमन घोडेस्वार, सुनील आगुटलेवार, मुकेश नानवटकर, लोकेश अंबाडकर, सचिन कांबळे, पंचम सलामे, स्वाती पाठक, संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, वंदना कुरटकर, राखी परते, पौर्णिमा दुबे, सुषमा मस्के, वर्षा लोंढे, तुलेशा नानवटकर यांनी हजेरी लावली हाेती.

Web Title: Greetings to Shivaraya everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.