उमरेड विभागातील शिक्षकांनी मांडल्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:00+5:302021-05-21T04:09:00+5:30
उमरेड : कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना एखाद्या शिक्षकास कोरोनाची बाधा होत मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची ...
उमरेड : कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना एखाद्या शिक्षकास कोरोनाची बाधा होत मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्यांचे निवेदन सोपवित उमरेड विभागातील कृती समितीच्या वतीने शिक्षकांनी आपल्या व्यथा मांडल्या. प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रमोद कदम यांच्याकडे निवेदन सोपवून विविध मागण्यांकडे लक्ष वेधल्या गेले.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाला सोपविण्यात आलेल्या पत्रानुसार शिक्षकांना कोविड कार्यातून कार्यमुक्त करण्यात यावे. तालुक्यातील लसीकरणाची एक विशिष्ट चमू तयार करण्यात यावी. जे अधिकारी शिक्षकांना काम न केल्यास निलंबित करण्याची धमकी देतात याकडेही गंभीरतेने लक्ष देण्यात यावे. शिक्षकांना वेठीस धरले जात असून, आमच्या समस्येकडे जाणीवेने लक्ष द्यावे, अशीही मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात खेमराज कोंडे, विष्णू राणे, नरेंद्र पिपरे, रामकृष्ण ठाकरे, कोहिनूर वाघमारे, शशांत नंदनवार, जगदीश लडके, सुदर्शन अंगडलवार, अंकेश्वर ठाकरे, संतोष ताजने आदींची उपस्थिती होती.