भीषण पाणीटंचाई : धरणांमध्ये केवळ १० टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 09:54 PM2019-04-20T21:54:31+5:302019-04-20T21:55:19+5:30
नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे.
नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात १८ तारखेपर्यंत केवळ ३४४ दलघमी (१० टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३२ टक्के पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये १० टक्के, लोअर नांद ६० टक्के, वडगाव प्रकल्पात एक टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २५ टक्के, सिरपूर २३ टक्के, पुजारीटोला ३७ टक्के, कालीसरार ५१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये १९ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३४ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा, वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १४ टक्के, धाममध्ये १२ टक्के, पोथरामध्ये २ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ८ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.
गोसेखुर्द-दिना, तोतलाडोह कोरडे
नागपूर विभगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या तोतलाडोह प्रकल्पाची एकूण क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ २२ दरघमी म्हणजेच २ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गोसेखुर्द प्रकल्प टप्पा दोनची क्षमता ७४० इतकी आहे. ते पूर्णत: कोरडा पडला आहे. त्यात आजच्याघडीला ० टक्के इतका पाणीसाठा आहे. नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरणात केवळ १ टक्के इतके पाणी आहे. तर गडचिरोलीतील दिना प्रकल्पही कोरडा पडला आहे.