जीएसटीत सुधारणा होऊ शकते : हंसराज अहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 09:04 PM2018-06-23T21:04:18+5:302018-06-23T21:07:02+5:30
जीएसटी चुकीचा नाही, हे लोकांना समजावून सांगत असताना आम्हालाही घाम फुटू लागला आहे. जीएसटीचे विधेयक हे संसदेमध्ये बहुमताने पारित झाले होते, असे असतानाही विरोधक याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. चुकीचा प्रचार करतात. जीएसटी हा काही ब्रह्मलिखित नाही. त्यात सुधारणा होऊ शकतात. पण, बेजबाबदार वक्तव्य योग्य नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीएसटी चुकीचा नाही, हे लोकांना समजावून सांगत असताना आम्हालाही घाम फुटू लागला आहे. जीएसटीचे विधेयक हे संसदेमध्ये बहुमताने पारित झाले होते, असे असतानाही विरोधक याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. चुकीचा प्रचार करतात. जीएसटी हा काही ब्रह्मलिखित नाही. त्यात सुधारणा होऊ शकतात. पण, बेजबाबदार वक्तव्य योग्य नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे केले.
द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाची नागपूर शाखा आणि वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने रामदासपेठ येथील एका हॉटेलमध्ये दोन दिवसीय विदर्भस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी दुपारी या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. आ. अनिल सोले प्रमुख अतिथी होते. यासोबतच वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे चेअरमन सीए संदीप केसी जैन, सचिव सीए पुरुषोत्तम खंडेलवाल, सीए अभिजित केळकर, नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए उमंग अग्रवाल, सचिव सीए किरीट कल्याणी, साकेत बागडिया, सीए सुरेन दुरुगकर, उत्तम प्रकाश अग्रवाल, जयदीप शहा प्रामुख्याने उपस्थित होते.
हंसराज अहीर म्हणाले, देशाच्या विकासासाठी करदात्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. परंतु कर देण्याची मानसिकता अजूनही लोकांच्या मनात नाही, अशा परिस्थितीत जनजागृती करून करदात्यांची संख्या वाढवण्यास चार्टर्ड अकाऊंटंट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तसेच जीएसटी व नोटाबंदी हा पंतप्रधानांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. देशाच्या विकासाला गती देणारा आहे. तेव्हा यासंबंधात चार्टर्ड अकाऊंटंटने लोकांमध्ये जनजागृती करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आ. अनिल सोले म्हणाले, चार्टर्ड अकाऊंटंटवर केवळ समाज नव्हे तर देशाला उभं करण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. समाजाला आणि देशाला दिशा देण्याची महत्त्वाची भूमिका चार्टर्ड अकाऊंटंटला बजवायची आहे. सीए संदीप जैन, जयदीप शहा, अभिजित केळकर, उमंग अग्रवाल यांनीही विचार व्यक्त केले. सुरेन दुरुगकर यांनी संचालन केले.
भारतीय तरुण सीएंना विदेशात प्रचंड मागणी
भारतातील तरुण चार्टर्ड अकाऊंंटंटला (सीए) विदेशात प्रचंड मागणी असल्याचे वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे चेअरमन सीए संदीप केसी जैन यंनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले. नुकत्याच बँकेतील घोटाळ्यात सीएंचीही भूमिका असल्यााबत पत्रकारांनी विचारले असता नियमानुसार अशा सीएंची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.