‘जीएसटी’ नोंदणी, व्यापाऱ्यांना डोकेदुखी

By admin | Published: April 28, 2017 02:57 AM2017-04-28T02:57:28+5:302017-04-28T02:57:28+5:30

बहुप्रतीक्षित ‘जीएसटी’ची (गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) जुलै महिन्यापासून अंमलबजावणी होणार असून,

GST registration, businessmen get frustrated | ‘जीएसटी’ नोंदणी, व्यापाऱ्यांना डोकेदुखी

‘जीएसटी’ नोंदणी, व्यापाऱ्यांना डोकेदुखी

Next

तांत्रिक अडथळे : अनेक व्यवसायांचा ‘कोड’च उपलब्ध नाही, साखळी उद्योग असलेल्यांना फटका
नागपूर : बहुप्रतीक्षित ‘जीएसटी’ची (गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) जुलै महिन्यापासून अंमलबजावणी होणार असून, यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. व्यापाऱ्यांना आता ‘जीएसटी’अंतर्गत ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची आहे. मात्र या नोंदणी प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे असून, किचकट पद्धतीमुळे व्यापारी हैराण झाले आहेत. काही व्यवसायांच्या ‘एसएसएन’ कोडचा नोंदणी प्रक्रियेत समावेश झालेला नाही. अशा स्थितीत नोंदणी होणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.‘जीएसटी’अगदी जवळ येऊन ठेपला असून, व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाचे ‘व्हॅट’मधून नव्या कराच्या प्रक्रियेत स्थलांतर करायचे आहे. ‘एसीईएस’ या संकेतस्थळावर जाऊन व्यापाऱ्यांना येथे अगोदर नोंदणी करणे अनिवार्य आहे. एकदा का ‘आॅनलाईन’ खाते तयार झाले की व्यवसायाशी निगडित सखोल माहिती तेथे भरायची आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याचे अनेक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
‘एचएसएन’ कोडच नाही
नोंदणी करताना ‘एचएसएन’ कोड (हार्मोनाईझ्ड सिस्टम नॉमनक्लेचर) टाकणे अनिवार्य आहे. शहरातील मोठ्या प्रमाणात किराणा, सौरऊर्जा, ई-रिक्षा इत्यादींशी संबंधित व्यापारी आहेत. काहींचा रवा, मैदा, सोजी यासारखे उत्पादन बनविण्याचा व्यवसाय आहे. मात्र या उत्पादनांचा ‘एचएसएन’ कोड उपलब्धच होत नसल्याने आपल्या व्यवसायाची नोंदणी कशी करावी, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. यासोबतच सौरऊर्जा, ई-रिक्षा उत्पादनांचा यात समावेश नाही.
केंद्रीभूत नोंदणीत अडचण
अनेक बँका किंवा औद्योगिक प्रतिष्ठानांच्या शहर, राज्य किंवा देशात विविध ठिकाणी शाखा आहेत. या सर्व शाखांची माहिती केंद्रीभूत नोंदणीनुसार न देता स्वतंत्रपणे द्यायची आहे. सुरुवातीला काही अडचण येत नाही. मात्र १०-१२ शाखांची माहिती दिल्यानंतर तांत्रिक अडचणी येतात. सर्व शाखांचा पत्ता, फोन क्रमांक, पिन कोड टाकणे अशक्य होत आहे. त्यामुळेच सेवाकरानुसार येथेदेखील ‘अपलोड’ची सुविधा देणे अपेक्षित आहे.
मुख्य व्यवसाय काय ?
‘जीएसटी’साठी नोंदणी करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांचे विविध व्यवसाय आहेत. तुमचा मुख्य व्यवसाय काय, अशी यात विचारणा करण्यात येत आहे. ज्यांचे अनेक व्यवसाय आहे, त्यांना मुख्य व्यवसाय काय हे सांगणे कठीण जात आहे.
‘सीए’ना देखील अडचणी
बऱ्याच व्यापाऱ्यांना ‘आॅनलाईन’ प्रणालीची माहिती नसते. त्यामुळे ते ‘सीए’च्या माध्यमातून नोंदणी करून घेत आहेत. मात्र ‘सीए’नादेखील या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बऱ्याच ‘सीए’कडून याबाबत तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात आम्ही निवेदन तयार केले असून ते प्रशासनाकडे सोपविणार आहोत, असे नागपूर सीए असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जोतवानी यांनी सांगितले.

Web Title: GST registration, businessmen get frustrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.