‘जीएसटी’ लागू झाल्यावर वाढेल देशाचा महसूल

By admin | Published: April 15, 2017 02:34 AM2017-04-15T02:34:05+5:302017-04-15T02:34:05+5:30

देशात आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी देशाचा एकूण महसूल १३ लाख कोटी रुपये इतका होता.

'GST' will increase country revenue after implementation | ‘जीएसटी’ लागू झाल्यावर वाढेल देशाचा महसूल

‘जीएसटी’ लागू झाल्यावर वाढेल देशाचा महसूल

Next

नितीन गडकरी : ‘आयआयएम-नागपूर’चा पहिला दीक्षांत समारंभ साजरा
नागपूर : देशात आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी देशाचा एकूण महसूल १३ लाख कोटी रुपये इतका होता. आता हा आकडा वाढून २० लाख कोटींवर पोहोचला आहे. मात्र ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर देशात आर्थिक क्रांती येईल व पुढील दोन वर्षांत देशाचा महसूल २८ लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’च्या दीक्षांत समारंभाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
‘व्हीएनआयटी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘आयआयएम’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सी.पी. गुरुनानी, संचालक प्रा. एल.एस. मूर्ती, ‘आयआयएम अहमदाबाद’चे संचालक प्रा.आशिष नंदा प्रामुख्याने उपस्थित होते. देशाच्या विकासात तरुणांची मौलिक भूमिका आहे. मोठ्या पदांवर गेल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत संवाद घटतो. देशाच्या विकासाच्या दृष्टीने विचार करत असताना संवाद, सहकार्य आणि समन्वयाने कार्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे. ‘आयआयएम’मधून बाहेर पडल्यानंतर नोकरी मागणारे बनण्याऐवजी रोजगार निर्माते बना, असे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले. नागपूर शैक्षणिक हब बनत आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध होत आहे. त्यामुळे ‘आयआयएम-नागपूर’ने आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्था होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी नेहमी स्वप्न पाहिले पाहिजेत. मात्र डोळे उघडे ठेवून त्यांच्या पूर्ततेसाठी झटले पाहिजे. जर शाश्वत यश हवे असेल तर ‘शॉर्टकट’च्या मागे न जाता मेहनतीने समोर गेले पाहिजे, असे प्रा.मूर्ती म्हणाले. ‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’च्या ५३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. सौमीत मिश्रा याला ‘स्कॉलिस्टीक परफॉर्मन्सह्णसाठी तर ‘बेस्ट आॅलराऊंडरह्ण म्हणून सूचक ध्रुव भरतभाई यास सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)

३३ विमानतळ बनणार
देशांतर्गत दळणवळण वाढविण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने प्रादेशिक ‘कनेक्टिव्हिटी’साठी चार हजार कोटी रुपये दिले आहेत. २१० कोटी रुपयांत ३३ विमानतळ बनविण्यात येतील. येत्या तीन व चार महिन्यांत ‘सी-प्लेन’देखील सुरू होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

‘आयएएस’ होणार : सौमित मिश्रा
सौमित मिश्रा हा विद्यार्थी ‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यानंतर ‘डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स’ या विषयात ‘पीएचडी’ करायची आहे. त्यानंतर ‘आयएएस’ होण्याचे माझे ध्येय आहे.
‘पीएचडी’ करणार : सूचक ध्रुव भरतभाई
‘आयआयएम-नागपूर’ची पहिलीच ‘बॅच’ असली गुणवत्तेत कुठेही कमतरता नव्हती. माझी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या माध्यमातून एका कंपनीत निवड झाली आहे. भविष्यात मला ‘आॅपरेशनल मॅनेजमेंट’मध्ये ‘पीएचडी’ करायची आहे, अशी प्रतिक्रिया सूचक ध्रुव भरतभाई या विद्यार्थ्याने दिली.

Web Title: 'GST' will increase country revenue after implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.