‘एमआरपी’त जीएसटीचा गोलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:32 AM2017-10-24T00:32:48+5:302017-10-24T00:33:33+5:30

देशात जीएसटी(वस्तू व सेवा कर)च्या नावावर ग्राहकांची लूट सुरू आहे. बहुतेक व्यापारी वस्तूच्या ‘एमआरपी’(कमाल किरकोळ किंमत)वर सीजीएसटी(केंद्रीय वस्तू व सेवा कर)व एसजीएसटी(राज्य वस्तू व सेवा कर)वसूल करीत आहेत.असे करणे अवैध आहे.

GST's breakup in MRP | ‘एमआरपी’त जीएसटीचा गोलमाल

‘एमआरपी’त जीएसटीचा गोलमाल

Next
ठळक मुद्देग्राहकांची होतेय लूट अज्ञानाचा गैरफायदा बिलावर टॅक्स स्लॅबचा उल्लेख नाही

धीरज शुक्ला।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात जीएसटी(वस्तू व सेवा कर)च्या नावावर ग्राहकांची लूट सुरू आहे. बहुतेक व्यापारी वस्तूच्या ‘एमआरपी’(कमाल किरकोळ किंमत)वर सीजीएसटी(केंद्रीय वस्तू व सेवा कर)व एसजीएसटी(राज्य वस्तू व सेवा कर)वसूल करीत आहेत.असे करणे अवैध आहे.
ग्राहकाने ‘एमआरपी’एवढी रक्कम देऊन वस्तू खरेदी केल्यास त्यात ‘जीएसटी’चा समावेश असतो. परंतु अनेक दुकानदार ‘एमआरपी’वर ‘जीएसटी’ लावत आहेत. त्यामुळे कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत आहे. जीएसटी ठरविण्याची व व्यापाºयांकडील कर सरकारी खात्यात जमा करण्याची जबाबदारी वस्तू व सेवा कर विभागावर आहे तर, वस्तूचे वजन व किमतीचा भाग वजन व मापे विभागाच्या अख्त्यारित येतो. १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर साठवलेला माल विकण्यासाठी कंपन्यांना मुदत देण्यात आली होती. ती मुदत संपल्यानंतर‘जीएसटी’चा समावेश करून एमआरपी निश्चित करण्यात आली तसेच वस्तू‘एमआरपी’नुसार विकण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु बहुतेक व्यापारी अनधिकृतपणे ‘एमआरपी’वर ‘जीएसटी’ लावत आहेत.

आयुक्तांकडे करावी तक्रार
नियमापेक्षा जास्त ‘जीएसटी’ वसूल करणाºया व्यापाºयाविरुद्ध जीएसटी आयुक्त किंवा उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली जाऊ शकते. तसेच अवैध नफाखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापित केंद्रीय व राज्यस्तरीय चौकशी समितीकडेही थेट तक्रार करता येते.
- ओमनारायण भांगडिया, सदस्य, राज्यस्तरीय चौकशी समिती (जीएसटी).

कडक कारवाई होऊ शकते
‘जीएसटी’च्या नावावर अधिक रक्कम वसूल केली जात असल्यास वजन व मापे विभागाकडे तक्रार करता येते. तसेच नियमापेक्षा जास्त ‘जीएसटी’ लावला जात असल्यास अवैध नफाखोरीसाठी कारवाई केली जाऊ शकते. चौकशीनंतर दोषी आढळून येणाºया व्यापाºयाला ग्राहकांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत करावी लागेल. त्याशिवाय व्यापाºयाची ‘जीएसटी’ नोंदणी रद्द होऊन त्याला कारावास व दंडदेखील होऊ शकतो.
- पूनमचंद अग्रवाल,
राज्य कर सहआयुक्त.

Web Title: GST's breakup in MRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.