व्यापाऱ्यांपुढे जीएसटीचे आव्हान
By admin | Published: March 27, 2017 02:15 AM2017-03-27T02:15:58+5:302017-03-27T02:15:58+5:30
१ जुलै २०१७ पासून देशात लागू होणाऱ्या जीएसटीचे व्यापाऱ्यांपुढे आव्हान आहे.
एनव्हीसीसीतर्फे जीएसटीवर कार्यशाळा : आॅनलाईन सेवा आवश्यक
नागपूर : १ जुलै २०१७ पासून देशात लागू होणाऱ्या जीएसटीचे व्यापाऱ्यांपुढे आव्हान आहे. या करातील तांत्रिक बाबी आणि वेळेत व्यवसायातील खरेदी-विक्रीची सूचना आॅनलाईन देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स (एनव्हीसीसी) आणि जीएसटी कौन्सिलमधील भारत सरकारची सल्लागार टॅली सोल्यूशनच्या सहकार्याने ‘टॅली जीएसटी यात्रा’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत गांधी यांनी टॅली कंपनीचे पश्चिम विभागाचे उत्पादक व्यवस्थापक आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दर्शन शाह यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एनव्हीसीसीचे सचिव जयप्रकाश पारेख यांनी कार्यशाळेच्या आयोजनाची माहिती दिली. जीएसटीमध्ये काही तरतुदी कठीण असून त्या समजून घेणे आवश्यक आहे.
दर्शन शाह यांनी सरळ सोप्या शब्दात जीएसटीची माहिती दिली. पॉवर पार्इंट सादरीकरणाद्वारे जीएसटीमधील सर्व तरतुदी इनपुट टॅक्स क्रेडिट, खरेदी-विक्रीचा मेळ, जास्त भुगतान झाल्यास त्याची दुरुस्ती आदींची माहिती दिली. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमात टॅली सोल्यूशन्सचे स्थानिक विक्री व्यवस्थापक सौरभ सावंत, निखिल देवगावकर, आलोक पागे उपस्थित होते.
कार्यशाळेत संस्थेचे पदाधिकारी, मयूर पंचमतिया, जगदीश बंग, अर्जुनदास आहुजा, सचिन पुनियानी, संजय अग्रवाल, फारुखभाई अकबानी, प्रभाकर देशमुख, ज्ञानेश्वर रक्षक, मनोज लटुरिया, महेशकुमार कुकरेजा, पंकजकुमार अग्रवाल, शंकर सुगंध, उमेश पटेल, बंडोपंत टेंभुर्णे, संजय गुप्ता, श्रावण फरकाडे, भवानीशंकर दवे, राहुल जैन, गिरीश मुंदडा, ए.के. देशपांडे, विजय चांडक, संदेश कनोजे, सुनील भाटिया, संतोष काबरा, चंद्रभान बारापात्रे, एम.आर. सिंघवी, साकिब पारेख, हरप्रितसिंग उप्पल, असीम बोरडिया, योगेश गोलछा, राजेश चौबे, रघुनाथ केंदूरकर आणि १५० पेक्षा जास्त संस्था आणि दुकानांचे अकाऊंटंट हजर होते.(प्रतिनिधी)