जीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:17 AM2018-06-30T00:17:22+5:302018-06-30T00:18:16+5:30

दिल्लीवरून चेन्नईला जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये शुक्रवारी दुपारी बिघाड झाला. यामुळे ही गाडी एक ते दीड तास गुमगावजवळ अडकून पडल्याने गाडीतील प्रवाशांची गैरसोय झाली. त्यानंतर या गाडीला नवे इंजिन लावून ती चेन्नईसाठी रवाना करण्यात आली.

GT Express engine fails | जीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

जीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय :  नागपूर जिल्ह्यातील  गुमगावजवळ अडकले प्रवासी


लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : दिल्लीवरून चेन्नईला जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये शुक्रवारी दुपारी बिघाड झाला. यामुळे ही गाडी एक ते दीड तास गुमगावजवळ अडकून पडल्याने गाडीतील प्रवाशांची गैरसोय झाली. त्यानंतर या गाडीला नवे इंजिन लावून ती चेन्नईसाठी रवाना करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार १२६१६ दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस शुक्रवारी दुपारी १ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. नागपूर स्थानकावरून ही गाडी चेन्नईकडे निघाली असताना अचानक गुमगावजवळ या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. याची माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आली. अधिकाऱ्यांनी तातडीने दुसरे इंजिन घटनास्थळी रवाना केले. तो पर्यंत जीटी एक्स्प्रेसचे इंजिन गाडीपासून वेगळे करण्यात आले. नवे इंजिन पोहोचताच ते जीटी एक्स्प्रेसला जोडण्यात आले. तो पर्यंत ही गाडी गुमगावजवळ अडकून पडली होती. यामुळे तब्बल दीड तास प्रवाशांना एकाच जागी बसून राहावे लागले.

Web Title: GT Express engine fails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.