पालकमंत्री बावनकुळे यांनी केले डॉ. आंबेडकरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:00 AM2018-11-27T00:00:49+5:302018-11-27T00:04:05+5:30
संविधान दिनानिमित्त पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अॅड. सुलेखा कुंभारे, माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधान दिनानिमित्त पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अॅड. सुलेखा कुंभारे, माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालय
विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या उपस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, के.एन.के.राव, सुधीर शंभरकर, राठी, सहायक आयुक्त मनीषा जायभाये, वर्षा गौरकार, तहसीलदार रवींद्र माने, सुजाता गावंडे, अनिल निनावे, नितीन गौर यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत भारताच्या संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने सुरुवात केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, अविनाश कातडे, विजया बनकर, सुजाता गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
महावितरण
काटोल रोड येथील महावितरण कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र्र खंडाईत यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना संविधानातील प्रस्तावनेची शपथ दिली. यावेळी मुख्य अभियंता दिलीप घुगल, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमेश शहारे, हरीश गजबे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, व्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.