मुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 08:18 PM2020-01-25T20:18:07+5:302020-01-25T20:20:20+5:30

मुख्यमंत्री स्वास्थ्य योजनेच्या धर्तीवर आता नागपुरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू रुग्णांना तातडीची आर्थिक मदत व औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी सुविधा मिळावी यासाठी पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना राबवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

Guardian Minister's Public Health Scheme on the backdrop of Chief Minister: Nitin Raut | मुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना : नितीन राऊत

मुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना : नितीन राऊत

Next
ठळक मुद्देशाळा व विद्यार्थ्यांच्या विकासावर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री स्वास्थ्य योजनेच्या धर्तीवर आता नागपुरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू रुग्णांना तातडीची आर्थिक मदत व औषधोपचार, शस्त्रक्रिया आदी सुविधा मिळावी यासाठी पालकमंत्री जनस्वास्थ्य योजना राबवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. डीपीसीच्या माध्यमातून ही योजन राबवली जाणार आहे. यासोबतच अनेक नागपूर स्तरावर अनेक योजनाही जाहीर करण्यात आल्या असून बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत पालकमंत्री राऊत यांनी याबाबतची माहिती दिली. पालकमंत्री राऊत यांनी सांगितले की, जनस्वास्थ योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन केला जाईल. यासोबतच गरीब गरजू कुटुंबासाठी पालकमंत्री दुग्ध विकास योजना, बुद्धिमत्ता व क्षमता असूनही पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि परीक्षा देण्यासाठी तातडीची मदत व्हावी यासाठी पालकमंत्री विद्यार्थी साहाय्यता निधी योजना, पालकमंत्री शाळा सक्षमीकरण योजना, पालकमंत्री हरित शहर व जलसंचय योजना, पालकमंत्री अध्ययन कक्ष सक्षमीकरण योजना जाहीर करण्यात आली.

आयएएस कोचिंगसाठी घेणार एनएडीटीची मदत
नागपुरात भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र आहे. याची सुधारणा व बळकटीकरण करण्याची घोषणा पालकमंत्री राऊत यांनी केली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना सुविधा निर्माण करण्यात येईल. प्रशिक्षणाची मुदत १ वर्षावरून दोन वर्षे केली जाईल. या सेंटरसाठी असलेल्या वसतिगृहाची क्षमता १०० वरून २०० पर्यंत वाढवली जाईल. तसेच चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून नागपुरातीलच राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी)मध्ये प्रशिक्षण देणाºया प्रशिक्षकांची मदत घेतली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्री सुसाट
पालकमंत्री म्हणून नितीन राऊत यांची ही पहिलीच डीपीसीची बैठक होती. परंतु या पहिल्याच बैठकीत राऊत यांनी पालकमंत्र्यांच्या नावावर तब्बल सात नवीन योजना जाहीर करून नागपूरच्या विकासाचा अ‍ॅक्शन प्लॅन कसा राहील याची झलक दाखवून दिली. एकूणच त्यांनी आपल्या कामाची शैली व गती कशी राहील, याचेच चित्र दाखवून दिल्याची चर्चा आहे.

Web Title: Guardian Minister's Public Health Scheme on the backdrop of Chief Minister: Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.