विरोधी पक्षनेतेपदासाठी गुडधे यांचे नाव आघाडीवर

By admin | Published: February 28, 2017 02:20 AM2017-02-28T02:20:46+5:302017-02-28T02:20:46+5:30

नागपूर महानगरपालिका निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर कॉंग्रेसमध्ये नवीन पेच उभा झाला आहे.

Guddha's name is topped for opposition leader | विरोधी पक्षनेतेपदासाठी गुडधे यांचे नाव आघाडीवर

विरोधी पक्षनेतेपदासाठी गुडधे यांचे नाव आघाडीवर

Next

पक्षश्रेष्ठी घेणार निर्णय : भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन होणार निर्णय
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर कॉंग्रेसमध्ये नवीन पेच उभा झाला आहे. मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड होणार यावरून विविध कयास लावण्यात येत आहेत. गटातटाचे राजकारण बाजूला सारून ताज्या दमाच्या नेत्याला हे पद देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. सद्यस्थितीत विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रफुल्ल गुडधे यांचे नाव आघाडीवर असून काही नगरसेवकांचेदेखील त्यांनाच अनुमोदन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यंदा महापालिकेत काँग्रेसचे २९ च नगरसेवक पोहोचू शकले. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांचा पराभव झाल्यामुळे आता नव्या नेत्याला संधी मिळणार आहे. कॉंग्रेसचा इतिहास लक्षात घेता या निवडीत गटातटाचे राजकारण तीव्र होण्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. मात्र गटातटामुळेच कॉंग्रेसचे निवडणुकांत पानिपत झाले, ही बाब पक्षश्रेष्ठी जाणतात. त्यामुळेच कॉंग्रेसमध्ये नवीन उत्साह भरण्यासाठी दमदार नेत्याचा शोध सुरू आहे.
निवडणुकांमधील एकूण कामगिरी लक्षात घेता प्रफुल्ल गुडधे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. प्रभाग ३८ मध्ये त्यांच्या बळावर कॉंग्रेसच्या सर्व जागा निवडून आल्या. विशेष म्हणजे त्यांचा पराभव व्हावा यासाठी भाजपाचे मोठे नेतेदेखील कामाला लागले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनीदेखील जयताळ््यात सभा घेतली होती. एका प्रकारे गुडधे विरुद्ध भाजपाची अशीच लढाई झाली. गुडधे सातत्याने चार वेळा निवडून आले आहेत. त्यांचे सभागृहातील कामदेखील चांगले राहिलेले आहे. आजच्या स्थितीत भाजपाला आव्हान देणारा त्यांच्याव्यतिरिक्त एकही नेता दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रफुल्ल गुडधे यांचे वडील व माजी मंत्री विनोद गुडधे पाटील हेदेखील भाजपाचे पूर्वाश्रमीचे नेते आहेत. भाजप नेत्यांशी तीव्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. भाजपाशी असलेले त्यांचे कट्टर वैर सर्वश्रुत असल्याची बाब प्रफुल्ल यांच्या पथ्यावर पडत आहे.
दुसरीकडे गुडधे यांच्यासोबतच नगरसेवक संदीप सहारे, संजय महाकाळकर व युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांचे नाव शर्यतीत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Guddha's name is topped for opposition leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.