जिल्हाधिकारी कार्यालयात उभारली मतदार जागृतीसाठी गुढी
By गणेश हुड | Published: April 9, 2024 06:58 PM2024-04-09T18:58:25+5:302024-04-09T18:58:55+5:30
गुढी पाडव्याचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मतदार जागृतीची प्रातिनिधीक गुढी उभारण्यात आली.
नागपूर : स्वीप अर्थात मतदारांच्या साक्षरतेसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांतर्गत मंगळवारी गुढी पाडव्याचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मतदार जागृतीची प्रातिनिधीक गुढी उभारण्यात आली.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे अधिकारी व कर्मचारी पारंपरिक वेषात आले होते. डॉ. अभिजीत चौधरी व डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.