कृषिपंप वीज धाेरणावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:23+5:302021-03-10T04:09:23+5:30
हिंगणा : महावितरण कंपनीच्या वतीने कृषिपंप वीज धाेरण २०२० व महाआवास अभियानांतर्गत आमगाव (देवळी) (ता. हिंगणा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात ...
हिंगणा : महावितरण कंपनीच्या वतीने कृषिपंप वीज धाेरण २०२० व महाआवास अभियानांतर्गत आमगाव (देवळी) (ता. हिंगणा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषिपंप वीज धाेरणावर मार्गदर्शन कार्यशाळेचे साेमवारी (दि. ८) आयाेजन करण्यात आले हाेते.
अध्यक्षस्थानी सरपंच कवडू भोयर हाेते तर मार्गदर्शक म्हणून महावितरणचे कार्यकारी अधिकारी प्रफुल लांडे उपस्थित हाेते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य सोनवाणे, ग्रामपंचायतचे सचिव राजू कोल्हे, शाखा अभियंता मनीष खोडे व वैभव नाईक, ग्रामपंचायत सदस्य रोशन कारनकर, अविनाश देवगडे, श्याम गौरकार, कविता भरडे, संगीता तांबे व सविता राऊत उपस्थित हाेते. यावेळी शेतकऱ्यांना राज्य शासनाचे कृषिपंप वीज धाेरण, शासनाच्या याेजना व इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यात आली. महाआवास अभियानांतर्गत महिला घरकुल लाभार्थ्यांचा गाैरव करण्यात आला.