महाराष्ट्रातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढविण्यासाठी ‘कन्सलटन्सी’चे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:31 PM2018-11-20T23:31:45+5:302018-11-20T23:32:39+5:30

‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातील विद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ै‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

The guidance of 'Consultancy' to increase the ranking of the universities of Maharashtra | महाराष्ट्रातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढविण्यासाठी ‘कन्सलटन्सी’चे मार्गदर्शन

महाराष्ट्रातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढविण्यासाठी ‘कन्सलटन्सी’चे मार्गदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाच्या निर्देशांनुसार खासगी कंपनीशी करार : खरोखरच दर्जा वाढणार का ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘एनआयआरएफ’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) महाराष्ट्रातीलविद्यापीठांचे देशातील स्थान हा एक चिंतेचा विषय आहे. राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. एका खासगी ‘कन्सलटन्सी’सोबत विविध विद्यापीठांना सामंजस्य करार करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनात विद्यापीठांना ‘रँकिंग’ वाढविण्याचे प्रयत्न करायचे आहेत. मात्र खरोखरच एखाद्या ‘कन्सलटन्सी’सोबत करार वाढल्याने विद्यापीठांचा दर्जा वाढणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१६ सालच्या ‘एनआयआरएफ’च्या पहिल्या १०० ‘रँकिंग’मध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचा समावेश होता. तर २०१७ व २०१८ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वगळता एकाही सार्वजनिक विद्यापीठाचा पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये समावेश नव्हता.
राज्यातील विद्यापीठांचे ‘रँकिंग’ वाढावे यासाठी राज्य शासनाने ‘आय केअर’ या एका खासगी ‘कन्सलटन्सी’ला नियुक्त केले आहे. राज्यातील सर्व अकृषी सार्वजनिक विद्यापीठे व १०० महाविद्यालयांसमवेत या ‘कन्सलटन्सी’चा सामंजस्य करार करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार विविध विद्यापीठांना संबंधित प्राधिकरणांमध्ये मान्यता घेण्यास सांगण्यात आले होते.
यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची सोमवारी व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक बोलविण्यात आली. यात हा प्रस्ताव ठेवण्यात आला व सामंजस्य करार करण्याच्या मुद्द्याला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.

खरोखर किती फायदा होणार ?
या ‘कन्सलटन्सी’ने कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान येथील विद्यापीठांसाठी काम केले आहे. आता राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीयसोबतच आंतरराष्ट्रीय ‘रँकिंग‘ वाढविण्यासाठी या ‘कन्सलटन्सी’कडून मार्गदर्शन करण्यात येईल, असे नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.नीरज खटी यांनी सांगितले. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित नऊ महाविद्यालयांचादेखील या ‘कन्सलटन्सी’सोबत करार होणार आहे. मात्र राज्यातील विद्यापीठांचा एकूण पसारा पाहता एखाद्या ‘कन्सलटन्सी’च्या मार्गदर्शनाने खरोखरच काही कालावधीतच बदल होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: The guidance of 'Consultancy' to increase the ranking of the universities of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.