संत्रा फळगळीच्या उपाययोजनेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:12 AM2021-08-29T04:12:06+5:302021-08-29T04:12:06+5:30
नागपूर : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि नागपूर कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना ...
नागपूर : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि नागपूर कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या पाहणीनंतर कृषी विभागाने आणि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.
कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी.एम. पंचभाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आभासी पद्धतीने ऑनलाइन मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. यात सुमारे १०० शेतकरी सहभागी झाले होते. कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कृषी महाविद्यालय शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद राठोड यांनी केले.
उद्यान विभागाचे प्रा. रमाकांत गजभिये, वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. एम.जे. पाटील, कीटकशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. हरीश सवई यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. विस्तार व शिक्षण विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. हर्षा मेंढे यांनी संचालन करून आभार मानले.
...
अशी सुचविली उपाययोजना
आंबिया बहारातील फळगळतीमध्ये संत्रा-मोसंबी झाडासाठी डीएपी एक किलो सूक्ष्म आणि १५० ग्रॅम झिंक सल्फेटची फवारणी करण्याचे सुचविण्यात आले. पावसात तीन-चार दिवसांचा खंड पडल्यास जीएथ्री १.५ ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट दीड किलो, १५ ग्रॅम स्पेप्टोसायक्लिन १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणे. १५ दिवसांनी २.४ डी. किंवा एनएए दीड ग्रॅम अधिक ३०० बोरीक आम्ल, थायोफनेट मिथाईल, कार्बेडामिज १०० ग्रॅम, मोनोपोटॅशियम फास्फेट १.५ किलो पाण्यात मिसळून फवारणे तसेच सलग तीन चार दिवस पाऊस आल्यास ॲलिएट २.५ ग्रॅमची फवारणी करणे, गरज पडल्यास दुसरी फवारणी मेटॉलाक्झिल ४ टक्के, मॅनकोझेब ६४ टक्के या बुरशीनाशकाची २.५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला.
...